घोडेगाव पोलीस ठाण्यातील गाड्या संबंधित नागरिकांनी घेऊन जावे

भिमाशंकर : घोडेगाव पोलीस ठाण्यात चोरी अपघात अशा खटल्यातील बेवारस अवस्थेत असलेल्या मोटर सायकल पडून आहेत. मागील दहा वर्षापासून कुणीही त्यांच्यावर मालकी हक्क सांगत नाही. त्यामुळे ज्या कोणा नागरिकांच्या गाड्या असतील त्यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे, आवाहन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी केले आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी केले आवाहन
भिमाशंकर : घोडेगाव पोलीस ठाण्यात चोरी अपघात अशा खटल्यातील बेवारस अवस्थेत असलेल्या मोटर सायकल पडून आहेत. मागील दहा वर्षापासून कुणीही त्यांच्यावर मालकी हक्क सांगत नाही. त्यामुळे ज्या कोणा नागरिकांच्या गाड्या असतील त्यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे, आवाहन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी केले आहे.

घोडेगाव पोलीस ठाणे येथे सुमारे ४० मोटरसायकली बेवारस, धूळखात, गंजलेल्या अवस्थेत पडून आहेत. सन २०१० पासून त्यांच्यावर कोणत्याही व्यक्तींनी आपला मालकी हक्क सांगितला नाही. तसेच आजपर्यंत कोणत्याही विमा कंपन्यांनी सदर जप्त मोटरसायकलवर दावा केलेला नाही. चोरी, अपघात, भांडण आदि खटल्यांतील या मोटरसायकली आहेत. ज्या नागरिकांच्या या मोटरसायकली असतील त्यांनी घोडेगाव पोलिस ठाण्यातील ०२१३३-२४४१३३ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात येऊन भेटावे, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी सांगितले.