विहिरीचे कठडे अतिवृष्टी झाल्याने विहिरीत गाडले गेले

मंचर : आंबेगाव तालुक्यातील लौकी येथील शेतकरी सोनाजी किसन थोरात यांच्या विहिरीचे कठडे जोरदार पावसामुळे पूर्णपणे विहिरीत गाडले गेले आहेत. अंदाजे दीड ते दोन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

मंचर :  आंबेगाव तालुक्यातील लौकी येथील शेतकरी सोनाजी किसन थोरात यांच्या विहिरीचे कठडे जोरदार पावसामुळे पूर्णपणे विहिरीत गाडले गेले आहेत. अंदाजे दीड ते दोन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तातडीने नुकसान भरपाई मिळावी.अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. लौकी येथील शेतकरी सोनाजी थोरात यांच्या विहिरीला नव्यानेच रिंग टाकून कठडे बांधणीचे काम पूर्ण झाले होते. परंतु चार दिवसापुर्वी झालेल्या ढगफुटीमुळे कठडे पूर्णपणे कोसळले. सदर घटनेची माहिती सरपंच संदेश थोरात यांनी प्रशासनाला कळवली. तलाठी शीलादेवी बोदडे यांनी पंचनामा केला. पाऊस पडत असताना मजूर व शेतकरी किसन थोरात स्वतः त्याठिकाणी कामावर उपस्थित होते. सुदैवाने जिवितहानी झाली नाही. किसन थोरात यांनी सोसायटीचे कर्ज काढून व दागिने गहाण ठेवून विहिरीचे कठडे बांधण्यासाठी रिंग टाकण्याचे काम पूर्णत्वास नेले होते. परंतु जोरदार पावसामुळे विहिरीचे कठडे पूर्णपणे खचून विहिरीमध्ये गाडले गेले. तसेच विहिरीमध्ये असणारी विद्युत पंपाची पाच एचपीची मोटार व केबल गाडली गेली आहे. प्रशासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी सरपंच संदेश थोरात यांनी केली आहे.