तरुणाने मारली इमारतीवरुन उडी, स्वतःवर धारदार शस्त्राने केले होते वार

राहत्या घरी स्वतःचा गळा चिरला. नंतर शरीरावर वार करुन जखमा केल्या, तरीही त्याचा जीव गेला नाही म्हणून त्याने इमारतीवरुन खाली उडी मारली. त्यानंतर विश्रांतवाडी पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले.

पुणे : पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात तरुणाने स्वतःवर वार करुन इमारतीवरुन उडी  ( jumped ) मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वतःवर धारदार शस्त्राने (sharp weapon) वार करुनही  (stabbing himself) जीव न गेल्याने तरुणाने टेरेसवरुन खाली उडी मारली. या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू (death) झाला आहे.

आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव राहुल रामा सूर्यवंशी आहे. राहूल याने घरातील धारदार शस्त्राने आधी स्वतःवर वार करुन घेतले होते. त्यामुळे त्याच्या अंगावर जखमा झाल्या होत्या. परंतु जीव जात नसल्याने त्याने इमारतीच्या टेरेसवरुन खाली उडी मारली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर राहुलने असे का केले याबाबत पोलिस तपास करीत आहेत. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल हा पत्नीसोबत विश्रांतवाडीत राहत होता. मोटारीतील माल खाली उतरविण्याचे काम करीत होता. लॉकडाऊनमुळे त्याची पत्नी गावी गेली होती. त्यामुळे राहुल घरी एकटाच राहत होता. त्याने काल राहत्या घरी स्वतःचा गळा चिरला. नंतर शरीरावर वार करुन जखमा केल्या, तरीही त्याचा जीव गेला नाही म्हणून त्याने इमारतीवरुन खाली उडी मारली. त्यानंतर विश्रांतवाडी पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र अति रक्तस्त्रावामुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच तरुणाने आत्हत्या का केली याचा पोलिस तपास करत आहेत.