rape in nagpur

२८ मे रोजी रात्री दहा वाजता हा प्रकार घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ वर्षाची ही युवती आपल्या घराजवळील एका दुकानात रात्री आईस्क्रीम घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी दुकानमालकाने आईस्क्रीम देण्याचा बहाणा करुन तिला आपल्या जवळ ओढले. तिच्या मनास लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले

    पुणे: दुकानात आईस्क्रीम आणण्यासाठी गेलेल्या १९ वर्षाच्या युवतीने घरी आल्यावर आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामागील कारणाचा शोध घेतला असताना ६१ वर्षाच्या दुकानदाराने तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वारजे माळवाडी पोलिसांनी दुकानदारावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी या युवतीच्या आईने वारजे माळवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

    २८ मे रोजी रात्री दहा वाजता हा प्रकार घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ वर्षाची ही युवती आपल्या घराजवळील एका दुकानात रात्री आईस्क्रीम घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी दुकानमालकाने आईस्क्रीम देण्याचा बहाणा करुन तिला आपल्या जवळ ओढले. तिच्या मनास लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले. या प्रकारानंतर ती घरी आली. तेव्हा तिच्या आई वडिलांनी इतक्या रात्री कुठं गेली होती, याची चौकशी केली. तेव्हा तिने सांगण्यास नकार दिल्याने त्यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर तिने घरातील कपडे धुण्याचा डिटर्जंट पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आई वडिलांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेले. तेव्हा तिने दुकानदाराने केलेल्या विनयभंगाची माहिती दिली.