प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

या प्रकरणी तरुणीच्या आईने चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी आकाश आणि फिर्यादी यांची १९ वर्षीय मुलगी यांच्यात प्रेमसंबंध होते.

    पिंपरी: प्रेमसंबंध ठेवल्यानंतर प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीने आत्महत्या केली. नोव्हेंबर २०२० ते २० जून २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.आकाश युवराज भोकसे (रा. कुरकुंडी, ता. खेड) याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तरुणीच्या आईने चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी आकाश आणि फिर्यादी यांची १९ वर्षीय मुलगी यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, आकाशने तरुणीशी लग्नास नकार दिला. तसेच तिचा मानसिक छळ करून तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केले. चाकण पोलिस तपास करत आहेत.

    लग्नाच्या आमिषाने बलात्कार
    लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २०१९ ते १८ जून २०२१ या कालावधीत बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी, धावडे वस्ती, चक्रपाणी वसाहत येथे घडली. नितिन इंद्रमोहन दहिरे (वय २८, रा. बालाजीनगर झापडपट्टी, भोसरी) याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत महिलेने भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी दहिरे याने फिर्यादी महिलेस लग्नाचे अमिष दाखविले. त्यानंतर त्याने महिलेशी वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवले. त्यातून महिलेला एक मुल झाले. मात्र, त्याने महिलेशी लग्न केले नाही.

    विनयभंगाच्या दोन घटना

    अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने हात धरून तिच्याशी अश्लील वर्तन केल्याचा प्रकार ममता चौक दिघी येथे घडला. या प्रकरणी महिलेने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गौरव रामविर जाधव (वय २८) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी गौरव याने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने हात धरला. तीला आपल्याजवळ ओढून विनयभंग केला. चिंचवड येथील घटनेप्रकरणी पिडीत महिलेने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अक्षय साधू थोरात (वय २५, रा. आनंदनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी थोरात हा महिलेला २०१९ पासून त्रास देत आहे. माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे म्हणत बळजबरीने घरात घुसणे, शिव्या देणे, चुकीचा स्पर्श करणे असा प्रकार आरोपी करत असल्याने महिलेने पोलीसात धाव घेतली.