हिंजवडीतील बंगल्यातून ४ लाख १६ हजारांची चोरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा भाऊ विंडमिल व्हिलेज सोसायटी, बंगला नंबर सी ३२  येथे राहतात. १७  नोव्हेंबर दुपारी २ ते ४ डिसेंबर दुपारी ३ या कालावधीत अज्ञात चोरट्याने फिर्यादी आणि त्यांच्या भावाच्या बेडरूममधील लाकडी कपाटातून ४ लाख १६  हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्क्म चोरून नेली.

पिंपरी : एका बंगल्यातून चोरट्याने ४ लाख १६ हजरांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना हिंजवड़ी येथे उघड़कीस आली आहे. ही घटना १७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत विंडमिल व्हिलेज सोसायटी, बंगला नंबर सी ३२ येथे घडली. याबाबत घरात काम करणा-या महिलेवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. अमित राजेंद्र डांगरे यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा भाऊ विंडमिल व्हिलेज सोसायटी, बंगला नंबर सी ३२  येथे राहतात. १७  नोव्हेंबर दुपारी २ ते ४ डिसेंबर दुपारी ३ या कालावधीत अज्ञात चोरट्याने फिर्यादी आणि त्यांच्या भावाच्या बेडरूममधील लाकडी कपाटातून ४ लाख १६  हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्क्म चोरून नेली. फिर्यादी यांचा संशय त्यांच्या घरात काम करणारी महिलेवर असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.