Crime

चोरट्यांनी कंपनीचे अ‍ॅक्सेस लॉक तोडून एस १ ते एस ५ इमारतीत प्रवेश केला. त्यांनी कार्यालयांमधील ६ लाख १९ हजार ४०० रुपयांचे कॉम्प्युटर आणि लॅपटॉप चोरुन नेले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे अधिक तपास करत आहेत.

    पिंपरी: हिंजवडी फेज २ येथील विप्रो कंपनीतून चोरट्यांनी ६ लाख १९ हजार रुपये किमतीचे कॉम्प्युटर आणि लॅपटॉप लांबविले आहेत. १९ एप्रिल रोजी कंपनीच्या एस १ ते एस ५ इमारतीतील कार्यालया मध्ये ही चोरीची घटना घडली आहे.

    किशोर सोमनाथ गहिले (वय ३१, रा. इंदिरानगर, निगडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.३०) फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी कंपनीचे अ‍ॅक्सेस लॉक तोडून एस १ ते एस ५ इमारतीत प्रवेश केला. त्यांनी कार्यालयांमधील ६ लाख १९ हजार ४०० रुपयांचे कॉम्प्युटर आणि लॅपटॉप चोरुन नेले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे अधिक तपास करत आहेत.