जपून जावा सारे…पुढे धोका आहे…

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर प्रवास धोकादायक

–  महामार्गाच्या साईट पट्ट्या खचल्या ;  छोट्या-मोठ्या अपघातांना निमंत्रण

दौंड : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या साईट पट्ट्या तीन ते पाच इंचांनी खचल्या असून रोज छोटे मोठे अपघात घडत आहे, हा महामार्गाची बिकट अवस्थाच अपघातांना निमंत्रण देत असल्याचे चित्र दिसत आहे, 

पुणे सोलापूर महामार्गावरील यवत ते इंदापूर महामार्ग देखभर आणि टोल वसूलीचे काम टाटा कंपनीला देण्यात आले आहे, यावेळी महामार्गावरील टोल वसूली करत असताना यवत ते इंदापूर एकूण ११० किलोमीटर महामार्गाची देखभार, दुरुस्ती, महामार्गावरील प्रवास करणाऱ्या लोकांना आपत्कालीन मदत तसेच अतिक्रमण , रस्त्याच्या दोन्ही बाजूला आणि मध्यभागी वृक्षांची लागवड करणे आणि वेळोवेळी या झाडांची योग्य निगा राखने या सारखी अनेक कामे टोल प्रशासनाच्या अंतर्गत ठेकेदारांना देण्यात आली आहेत, पुणे सोलापूर महामार्ग निर्मितीच्या वेळेस महामार्गाच्या दोन्ही बाजूला वृक्षांची लागवड करण्यात आली आहे, या वृक्षांची देखभार आणि पाणी व्यवस्थापणाची जवाबदारी टोल प्रशासन यांच्या अंतर्गत ठेकेदारांना देण्यात आली आहे, यावेळी एका महिन्यामध्ये लाखो रुपये महामार्गाची देखभाल दुरुस्तीसाठी खर्च केला जातो, पण टोल प्रशासन व ठेकेदारांच्या संगममताने मार्गाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामात हलगर्जीपणा करत प्रवाश्यांना जीवाशी खेळ खेळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे,

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील यवत ते इंदापूर पर्यंतच्या मार्गाच्या दोन्ही बाजूच्या साईट पट्ट्या अनेक ठिकाणी तीन ते पाच इंचांनी खचल्या आहेत, अनेक वर्षांपासून या मार्गाच्या साईट पट्ट्यांवर मुरूमचा भराव घातला नसल्याचे आरोप स्थानिक नागरिक करत आहेत, तसेच संबंधित विभागाकडे तक्रार करून ही अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, या मार्गावरील साईट पट्ट्या खचल्यामुळे रोज दुचाकीचे अनेक छोटे मोठे अपघात घडत आहेत, त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून महामार्गावरून प्रवास करावा लागत आहे.

 पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या साईट पट्ट्यांची दुरुस्तीची कामे उन्हाळ्यात पूर्ण करणे अपेक्षित असताना संबंधित टोल प्रशासनच्या अधिकाऱ्यांनी दुरुस्तीची कामे करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली असल्याचे समोर येत आहे, तसेच महामार्गालगत सांडपाणी साचत असल्याने दुर्गंधी सर्वत्र पसरली आहे. महामार्गावरील इतर दुरुस्तीची कामे सुरू आहेत, यामुळे साईट पट्ट्यांचे नंतर पूर्ण केली जाईल असे टोल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले

दरम्यान, या प्रकरणाची वरिष्ठांनी गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्याना योग्य सूचना देऊन महामार्गावरील साईट पट्ट्यांवर त्वरित मुरूमाचा भराव घालावा अशी मागणी स्थानिक नागरिक व प्रवासी करत आहेत,