कृषी विभागासाठी लॉकडाऊन नसणार : कृषीमंत्री दादा भुसे

पुणे : करोना विषाणूमुळे जगभरातील बाजार पेठ ठप्प झाली आहे. यामध्ये सर्वाधिक फटका कृषी विभागाला बसला आहे. त्यामुळे येत्या काळात पुढील लॉक डाऊन जाहीर करण्यात आल्यास, कृषी विभागास लॉक डाऊन नसणार आहे अशी

पुणे : करोना विषाणूमुळे जगभरातील बाजार पेठ ठप्प झाली आहे. यामध्ये सर्वाधिक फटका कृषी विभागाला बसला आहे. त्यामुळे येत्या काळात पुढील लॉक डाऊन जाहीर करण्यात आल्यास, कृषी विभागास लॉक डाऊन नसणार आहे अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तसेच टाेळधाडीचे संकट िनयंत्रणात अाणू असा िवश्वासही त्यांनी व्यक्त केला.  

राज्यात पुढील लॉक डाऊन जाहीर झाल्यास कृषी विभागास अधिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्या प्रश्नावर कृषीमंत्री दादा भुसे यांनी भूमिका मांडली. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे विशेष बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर कृषीमंत्री दादा भुसे यांनी पत्रकाराशी संवाद साधला. त्यावेळी राज्यमंत्री विश्वजीत कदम हे देखील उपस्थित होते.

यावेळी कृषीमंत्री दादा भुसे म्हणाले की, करोना विषाणू चा सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला बसला आहे. शेतकरी पुन्हा उभा राहण्याच्या दृष्टीने विशेष उपाय योजना केल्या जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून रासायनिक खते उपलब्ध करून दिली जात आहेत. 50 हजार मेट्रिक टन बफर स्टॉक तयार करण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्णय देखील घेतला आहे. तर काही ठिकाणी शेतकर्‍यांना कर्ज वाटप देखील झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की, आगामी काळ लक्षात घेता. कापूस,कांदा,मका यासह इतर माल खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर शेतमाल वाहतूक करणाऱ्यांना पोलिसांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

ड्रोनच्या माध्यमातून कीटकनाशक फवारणीच्या माध्यमातुन शेतीवरील टोळधाड संकट नियंत्रणात आणणार : कृषीमंत्री दादा भुसे

राज्यातील अमरावती जिल्ह्यात  टोळधाडमुळे एक वेगळेच संकट कृषी विभागा समोर निर्माण झाला आहे. त्यादृष्टीने कृषी विभागा मार्फत टोळधाड किड्याचा आता पर्यंत 50 टक्के नायनाट करण्यात यश आले आहे. अद्यापही त्या भागात टोळधाड असल्याने, अग्निशमन बंब, त्याचबरोबर ड्रोनच्या माध्यमातून कीटकनाशक फवारणी करून, तेथील शेतीवरील संकट नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न असणार आहे. अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली.