वाघोलीत रस्त्यांची दर्जेदार कामे होणार

वाघोली: पुणे शहरालगचे मोठे उपनगर म्हणून वाघोलीकडे पाहिले जात असून तेव्हड्याच मोठ्या प्रमाणात नागरी लोकसंख्या वाढली असून अधिक प्रमाणात नागरीकरण होऊन मोठ्या लोकवस्त्या वाढत आहेत. तेव्हड्याच प्रमाणात नागरिकांसमोर रस्त्यांचा, वाहतुकीचा प्रश्न समोर येत असताना हा वाघोलीतील रस्त्यांचा प्रश्न व समस्या समजून घेऊन शिरूर-हवेलीचे आमदार अँड.अशोक पवार हे दुरवस्थेत असलेल्या रस्त्यांची पाहणी करून महत्वपूर्ण असणाऱ्या प्रमुख रस्त्यांची कामे करण्यासाठी सज्ज असून यापुढील काळात आमदार अशोक पवार यांच्या आमदार निधीतून व प्रयत्नांतून वाघोली परिसरात विविध महत्वपूर्ण रस्त्यांची दर्जेदार कामे होणार आहेत. यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ हे रस्त्यांची कामे करून घेण्यासाठी आमदार पवार यांच्यासोबत आहोत. तर यामध्ये भक्कम स्वरूपाची रस्त्याच्या कामांमध्ये जास्तीत जास्त कामे ही सिमेंटी-काँक्रीटीकरण करून दर्जेदार रस्त्याची कामे शासकीय बांधकाम खात्याकडून करून घेण्यासाठी आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हीही प्रयत्न करीत असल्याचे मत आमदार अशोक पवार यांच्यासोबत रस्त्यांची पाहणी करताना माजी उपसरपंच तथा वाघेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र सातव पाटील यांनी व्यक्त करताना सांगितले.

केसनंद फाटा ते काळेचा ओढा यासाठी मोठा कोटीने निधी मंजूर झाला असून हा रस्ता रुंदीने ७ मीटर मंजूर झाला असून नागरिकांनी सहकार्याची भूमिका ठेवली तर दोन्ही बाजुंनी दीड-दीड मीटर असा ३ मीटर रस्ता वाढविला तर रस्त्याची रुंदी १० मीटर बांधकाम खाते करायला तयार असल्याचे शेवटी सातव पाटील यांनी सांगितले.
वाघोली(ता.हवेली) येथे दुरवस्था झालेल्या केसनंद फाटा ते काळेचा ओढा या रस्त्याची पाहणी शिरूर-हवेलीचे आमदार अँड.अशोक पवार यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत तर स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत केली.केसनंद फाटा ते काळेचा ओढा दीड किलो मिटर लांबीच्या सिमेंटच्या काँक्रीटीकरण रस्त्यासाठी २ कोटी रुपये मंजूर झाले असून कामाची निविदा पूर्ण झाल्यानंतर रस्त्याचे काम सुरू होणार असल्याचे आमदार पवार यांनी यावेळी सांगितले.याप्रसंगी माजी उपसरपंच तथा वाघेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र सातव पाटील, बाळासाहेब सातव, वाघेश्वर डेअरीचे प्रसिद्ध उद्योजक गणेश सातव,सार्वजनिक बांधकाम शाखेचे कार्यकारी अभियंता अजय भोसले, सामाजिक कार्यकर्ते गणेश गोगावले, शाखा अभियंता प्रशांत पवार,सचिन देशमाने,कंत्राटदार किशोर विटकर,बाळासाहेब शिवरकर,कैलास सातव,किसन जाधव,बाळासाहेब शिंदे,आदी लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते.