पुण्यात या गोष्टींवर असणार निर्बंध ; पालकमंत्री अजित पवारांनी बैठकीत दिली माहिती

येत्या आठ दिवसांत कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आली नाही तर नाईलाजाने जिल्ह्यात 'लॉकडाऊन' बाबत २ एप्रिल ला निर्णय घेण्यात येईल, असे निर्देश देवून कोरोना प्रतिबंधासाठी नागरिकांनी नियम कडक पाळावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले

  पुणे: पुणे जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. येत्या आठ दिवसांत कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आली नाही तर नाईलाजाने जिल्ह्यात ‘लॉकडाऊन’ बाबत २ एप्रिल ला निर्णय घेण्यात येईल, असे निर्देश देवून कोरोना प्रतिबंधासाठी नागरिकांनी नियम कडक पाळावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले. या बैठकीत या मुद्द्यावर अधिक भर देण्यात आला आहे

  – लॉकडाऊन टाळण्यासाठी नागरिकांनी कडक नियम पाळावेत

  – जम्बो हॉस्पिटल्स पूर्ण क्षमतेने सुरु केले जाणार आहे.

  – खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी ५० टक्के राखीव बेड ठेवण्याच्या सूचना देण्यात आला आहे

  – कोरोनासाठी सुरू करण्यात लसीकरण केंद्रे ६०० पर्यंत वाढवण्यात येणार आहेत.

  – शाळा, महाविद्यालये ३० एप्रिल पर्यंत बंद ठेवली जाणार आहे.

  – कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे यापुढे लग्न समारंभ ५० व्यक्तींच्या उपस्थितीतच कार्यक्रम कारण्याची परवानगी देण्यात आली आहे.

  – अन्य सार्वजनिक, राजकीय, खाजगी कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे.

  – शहरातील सर्व सार्वजनिक उद्याने फक्त सकाळी सुरु असणार आहेत.

  – मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

  – होळी व अन्य सण समारंभ घरगुती स्वरुपात साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  – दहावी, बारावी व एमपीएससी च्या परीक्षा पुर्व नियोजित वेळेनुसार होतील. तथापि, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने काही उपाययोजना करण्यात येत आहेत.