माळेगाव येथील भवानीमाता मंदिरातील दान पेटीवर चोरट्यांचा डल्ला

तुळजा भवानी माता मंदिर निरा-बारामती या राज्यमार्गा पासून पाचशे मीटर अंतरावर आहे. या मंदिरातील दान पेटी अज्ञात चोरट्यानी चोरून नेली. ही चोरी करताना सीसीटिव्हीची मोडतोड केली.

बारामती : बारामती तालुक्यातील माळेगाव येथील श्री तुळजा भवानी मंदिरात चोरट्यांनी दानपेटी फोडून अंदाजे सोळा हजार रुपये चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली आहे. शासनाचा तीर्थक्षेत्र क वर्गाचा दर्जा प्राप्त माळेगाव बागेतील श्री तुळजा भवानी माता मंदिर निरा-बारामती या राज्यमार्गा पासून पाचशे मीटर अंतरावर आहे. या मंदिरातील दान पेटी अज्ञात चोरट्यानी चोरून नेली. ही चोरी करताना सीसीटिव्हीची मोडतोड केली.सदर पेटीत अंदाजे सोळा हजार रुपये दान होते. ही पेटी मंदिरा लगत उसाच्या शेतात टाकून देण्यात आली आहे.ही घटना चोरी सीसीटिव्हीत कैद झाली आहे.
चोरीची घटना सकाळी कळल्यानंतर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब भोसले यांच्यासह रमेश तावरे,बाबासाहेब पैठणकर,यशवंत तावरे,हनुमंत सस्ते,वसंत गायकवाड,तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष अमित तावरे व ग्रामस्थांकडून मंदिरात गर्दी केली.
दरम्यान यावेळी तालुका पोलीस निरीक्षक महेश ढवाण,माळेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विधाते,पोलीस हवालदार अमोल खांडेकर,योगेश चितारे,मनोज लांबोळे,विकास मदने यांनी भेट देऊन मंदिराची पहाणी केली. या चोरीची फिर्याद अध्यक्ष बाळासाहेब भोसले यांनी दिली असून तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश विधाते करत आहेत.
सिंम्बा घटनास्थळी दाखल
माळेगाव येथील भवानीमाता मंदिरात झालेल्या चोरीमुळे एकच खळबळ उडाली. जनतेचा उद्रेक होऊ नये, यासाठी पुणे येथील प्रसिद्ध सिंम्बा नावाच्या श्वाॅनाला पाचारण करण्यात आले.मात्र चोरट्यांचा माग लागू शकला नाही.