माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्या पुतण्यांची बंद घरे चोरट्यांनी फोडली ; १०० तोळे सोन्यासह लाखोंची लूट

दोघांचे कुटुंब बाहेर गावी फिरण्यास गेले होते. ते रविवारी परत आले. यावेळी त्यांना घरफोडी झाली असल्याचे दिसून आले. त्यांनी पाहिले असता त्याच्या घरातून सोन्या, चांदीचे १०० तोळे दागिने आणि ४ लाखांची रोकड असा ५३ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्हीची पडताळणी आहे. त्यात तिघे जण घरात शिरून काही तासात सोने आणि रोकड घेऊन पसार झाले आहे.

    पुणे : संगमवाडी गावात माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्या पुतण्यांची बंद घरे फोडून चोरट्यांनी १०० तोळे दागिने आणि रोकड चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामभाऊ मोझे यांचे पुतणे हरिश्चंद्र मनोहर मोझे आणि मोहन मनोहर मोझे हे संगमवाडी भागात राहतात.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचे कुटुंब बाहेर गावी फिरण्यास गेले होते. ते रविवारी परत आले. यावेळी त्यांना घरफोडी झाली असल्याचे दिसून आले. त्यांनी पाहिले असता त्याच्या घरातून सोन्या, चांदीचे १०० तोळे दागिने आणि ४ लाखांची रोकड असा ५३ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्हीची पडताळणी आहे. त्यात तिघे जण घरात शिरून काही तासात सोने आणि रोकड घेऊन पसार झाले आहे. अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत.