चोरांचा डॉक्टरच्या घरावर डल्ला २ लाख ११ हजाराचा ऐवज लंपास

चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून २ लाख १०हजारांचा ऐवज चोरून नेला

सदाशिव पेठेतील सरस्वती प्रसाद इमारतीत राहणाऱ्या एका सेवानिवृत्त सरकारी डॉक्टरांचे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी २ लाख ११ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान सदाशिव पेठेतील घडली. याप्रकरणी अलकनंदा अशोक वाडेकर (वय ७१) यांनी विश्रामबाग पोलीस( police station) ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलकनंदा गृहिणी असून त्यांचे पती अशोक सेवानिवृत्त सरकारी डॉक्टर आहेत. लॉकडाउनमुळे अशोक मुंबईतील घरी थांबले होते. त्यामुळे अलकनंदा ९ सप्टेंबरला पुण्याहून मुंबईत त्यांच्याकडे गेल्या होत्या. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून २ लाख १०हजारांचा ऐवज चोरून नेला. अलकनंदा काल मुंबईहून पुण्यात आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सी. एस. वाबळे तपास करीत आहेत.