मास्क न वापरल्यामुळे बत्तीस जणांना दंड

भोर : सार्वजनिक ठीकाणी वावरताना मास्क न वापरल्यामुळे शहर व तालुक्यातील बत्तीस जणांकडून पोलीसांनी सोळा हजार रूपये दंड वसुल केला.

 भोर : सार्वजनिक ठीकाणी वावरताना मास्क न वापरल्यामुळे शहर व तालुक्यातील बत्तीस जणांकडून पोलीसांनी सोळा हजार रूपये दंड वसुल केला. त्यामध्ये शहरासह कापूरहोळ,नसरापूर,वेळू येथील नागरीकांचा समावेश आहे. सोमवारी सात रूग्ण नव्याने आढळल्यामुळे ही कारवाई अधिक कडक करणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.