गाई आणि वासरांना पळवून नेण्यासाठी केले जातेय ‘हे’ कृत्य ; घटना CCTV  मध्ये कैद

या सीसीटीव्ही फुटेजमध्ये भटक्या गाईंना इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले जात असल्याचे कैद झाले आहे. अज्ञात तरुणांनी गाईला पाव खायला टाकले आणि भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले.

    पुणे: लोणावळा परिसरातील ओळकाईवाडी येथे रात्रीच्या वेळी गाई आणि वासरांना बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन देऊन पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले आहे.

    या सीसीटीव्ही फुटेजमध्ये भटक्या गाईंना इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले जात असल्याचे कैद झाले आहे. अज्ञात तरुणांनी गाईला पाव खायला टाकले आणि भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर चार चाकी वाहनांमध्ये गाईला भरुन नेण्याचा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. संबंधित घटनेची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.