मुलगा होण्यासाठी साधूने विवाहितेला नग्न करून केले हे कृत्य

साधूने हातवारे करून विवाहितेला मुलगा होण्यासाठी अंगारा खायला दिला. काही अंगारा विवाहितेला अंगावरील कपडे उतरविण्यास सांगून अंगारा व हळदी-कुंकू तिला लावले

    पिंपरी: विवाहित महिलेला दोन्ही मुली झाल्या. मात्र मुलगा झाला नाही यासाठी अंधश्रद्धेतून ( superstition) साधूकडे नेत मुलगा व्हावा यासाठी अघोरी प्रकार केल्याचे समोर आले आहे. या साधूने दिलेला अंगारा व हळदी- कुंकू विवाहितेला पूर्णपणे नग्न (naked)करत तिच्या संपूर्ण अंगाला लावले. इतकेच नव्हे तर मुलगा व्हावा म्हणून अंगाला खायला दिल्याचा अघोरी प्रकार समोर आला आहे. खेड तालुक्यातील खालूंब्रे येथे घडल्याचे सामोर आले आहे. याप्रकरणी पती आणि सासूवर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार(Witchcraft Prevention Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मुलगा होण्यासाठी ऋषिकेश आणि प्रमिला यांनी विवाहितेला कामशेत जवळील एका गावातील साधूकडे नेले. साधूने हातवारे करून विवाहितेला मुलगा होण्यासाठी अंगारा खायला दिला. काही अंगारा कागदामध्ये बांधून दिला. घरी आल्यावर पती ऋषिकेश आणि सासू प्रमिलाने विवाहितेला अंगावरील कपडे उतरविण्यास सांगून साधूने दिलेला अंगारा व हळदी-कुंकू तिला लावले. आरोपींवर विनयभंग आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक वाघमोडे तपास करत आहेत.

    पती ऋषिकेश सुदाम बोत्रे आणि सासू प्रमिला सुदाम बोत्रे तसेच कामशेत जवळील एका गावातील साधू अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विवाहितेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ६ ऑक्टोबर २०१७ ते २१ ऑगस्ट २०२१ या कालावधीत घडला आहे. आरोपी ऋषिकेश याला दोन मुली आहेत. दोन मुली झाल्याच्या कारणावरून तसेच पत्नीच्या आई-वडीलांनी योग्य तो मानपान न केल्याच्या कारणावरून ऋषिकेशने पत्नीला वेळोवेळी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.