pruthviraj chavhan

सरसकट विक्रीस काढलेल्या कंपन्या सध्या किती नफा मिळवून देत आहेत त्याची आकडेवारी केंद्र सरकारने जाहीर करावी. सार्वजनिक कंपन्या मोडीत काढण्याचे हे धोरण म्हणजे निव्वळ धूळफेक असून मोदींच्या उद्योगपती मित्रांसाठी केलेली हातचलाखी असल्याची खरमरीत टीका माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

    पुणे : सरसकट विक्रीस काढलेल्या कंपन्या सध्या किती नफा मिळवून देत आहेत त्याची आकडेवारी केंद्र सरकारने जाहीर करावी. सार्वजनिक कंपन्या मोडीत काढण्याचे हे धोरण म्हणजे निव्वळ धूळफेक असून मोदींच्या उद्योगपती मित्रांसाठी केलेली हातचलाखी असल्याची खरमरीत टीका माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

    राजीव गांधी स्मारक समितीच्यावतीने ‘लोकशाही की खाजगीशाही? : केंद्र सरकारचे कर्तव्यापासून पलायन’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे, सीपीएमचे नेते कॉम्रेड अजित अभ्यंकर ज्येष्ठ ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, बँक असोसिएशनचे ज्येष्ठ पदाधिकारी देविदास तुळजापूरकर उपस्थित होते काँग्रेसचे प्रवक्ते व राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष गोपाळ दादा तिवारी यांनी या चर्चासत्राचे आयोजन केले होते.

    केंद्र शासनाच्या राष्ट्रीय चलणीकरणाच्या धोरणातील त्रुटींवर टीका करताना चव्हाण म्हणाले, मोदी सरकारने मातीमोल किंमतीमध्ये सार्वजनिक उपक्रमांची मालमत्ता विकायला काढली आहे. याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे काय करणार, आता सर्वच यंत्रणा आपण मोडीत काढत आहोत, उद्या करार संपल्यानंतर संबंधीत कंपनीने ४-५ वर्षांनी काढता पाय घेतल्यास केंद्र सरकार त्या कंपन्या पुन्हा चालवू शकेल का, या कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांचे भाडे ठरविण्याचा अधिकार कुणाला असेल, त्यावर शासनाचे नियंत्रण उरणार नाही असे अनेक प्रश्न यातून निर्माण होत आहेत.