कोरोना नियमांचे उल्लंघन प्रकरणी केलेल्या कारवाईतून  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कामवाली इतकी रक्कम

शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथील केले आहेत. परंतु, निर्बंध शिथील होताच नागरिकांची बेफिकीरीही वाढत आहे.

    पिंपरी: पिंपरी – चिंचवड शहरात कोरोनाचा प्रसार सुरु झाल्यापासून महापालिका प्रशासनाकडून नियमांचे उल्लंघन (violation of Corona Rules)करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, विनामास्क फिरणे, सुरक्षित अंतर न पाळणे, विनाकारण बाहेर फिरणे अशा तब्बल ९० हजार ७३८ नागरिकांवर आजपर्यंत कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल ४ कोटी ५८ लाख ४३ हजार ४१६ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

    पिंपरी – चिंचवड शहरात १० मार्च २० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. तेव्हापासून महापालिकेकडून नागरिकांना मास्क घाला, सुरक्षित अंतर ठेवा या कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. कोरोनाची पहिली, दुसरी अशा तीव्र लाटा येऊन गेल्या. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. परंतु, अद्यापही अनेक नागरिकांकडून नियमांचे पालन होताना दिसून येत नाही. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथील केले आहेत. परंतु, निर्बंध शिथील होताच नागरिकांची बेफिकीरीही वाढत आहे.
    महापालिका प्रशासनाकडून कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाते. आजपर्यंत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या ५ हजार ९८० नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून १५ लाख ३५ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला. विनामास्क फिरणाऱ्या ८३ हजार ५७३ जणांकडून ४ कोटी १७ लाख ८६ हजार ५१४ रुपये दंड वसूल झाला. तर, सुरक्षित अंतर न बाळगणाऱ्या १ हजार १०२ जणांकडून २४ लाख ८० हजार रुपये दंड वसूल केला आहे. याशिवाय कोणत्याही कारणाशिवाय बाहेर फिरणाऱ्या १६८ नागरिकांकडून १ लाख २६ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे आजपर्यंत ९० हजार ७३८ नागरिकांवर कारवाई करत ४ कोटी ५८ लाख ४३ हजार ४१६ रुपयांचा दंड वसूल झाला आहे.
    नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या बार आणि रेस्टॉरंटवरही कारवाई केली आहे. पहिल्यांदा नियमाचे उल्लंघन करणाऱ्या १ हजार ३७० जणांकडून ३४ लाख २५ हजार रुपये, दुसऱ्यावेळी उल्लंघन करणाऱ्या १०३ जणांकडून ५ लाख १५ हजार रुपये आणि तिसऱ्यादा नियमाचे उल्लंघन करणाऱ्या ११ नागरिकांकडून ९० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. असे तीनवेळा नियमांचे उल्लंघन केलेल्या १ हजार ३८० नागरिकांकडून ४० लाख ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.