नाना पटोले यांच्या स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या घोषणेवर शरद पवार यांनी केलं पहिल्यांदाच भाष्य…

आपल्या पक्षाची संघटनात्मक शक्ती वाढवण्यासाठी यात काही गैर नाही. शिवसेना असो, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी असो सर्व पक्षांना संघटना वाढवण्याचा पूर्ण अधिकार असून याबद्दल आमच्यात सामंजस्य असून कुठेही मतभेद नाही, असं पवार म्हणाले.

    बारामती: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा करून महाविकास आघाडी सरकारमध्ये नव्या वादाला सुरुवात करून दिली होती. पण, आपल्या पक्षाची संघटनात्मक शक्ती वाढवण्यासाठी यात काही गैर नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाही, हे स्पष्ट केलं. एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना शरद पवार यांनी नाना पटोले यांच्या स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या घोषणेवर पहिल्यांदाच भाष्य केलं.

    आपल्या पक्षाची संघटनात्मक शक्ती वाढवण्यासाठी यात काही गैर नाही. शिवसेना असो, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी असो सर्व पक्षांना संघटना वाढवण्याचा पूर्ण अधिकार असून याबद्दल आमच्यात सामंजस्य असून कुठेही मतभेद नाही, असं पवार म्हणाले.

    महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना आम्ही काही मुद्यांवर एकत्र आलो. त्यावेळी कॉमन मिनीमम कार्यक्रम तयार करण्यात आला होता. सरकार चालवत असताना काही ना काही अडचणी येत असतात. या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी एक यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे. यात काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई, तर राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि जयंत पाटील हे समन्वय साधण्याचं काम करतात.असं त्यांनी सांगितलं होतं.