कोरोनावरील लस संदर्भात सीरम इन्स्टिट्यूटने दिली ‘ही’ माहिती

  • सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने बिल अँण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन सोबत भागीदारी केली असून कोरोनावरील लस बनविण्यात येणार आहे. ही लस भारतासह इतर ९२ देशांना उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तसेच या लसीची किंमत ३ अमेरिकन डॉलर्सहून ही कमी म्हणजेच २२५ ते २५० रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे.

पुणे : संपर्ण जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लस हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. जगभरातील अनेक डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञांकडून कोरोना विषाणूवर लस विकसीत करण्याचे काम सुरू आहे. परंतु आता कोरोनावरील लस संर्दभात पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने काल शुक्रवारी एक महत्त्वाची माहिती दिली आहे.   

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने बिल अँण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन सोबत भागीदारी केली असून कोरोनावरील लस बनविण्यात येणार आहे. ही लस भारतासह इतर ९२ देशांना उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तसेच या लसीची किंमत ३ अमेरिकन डॉलर्सहून ही कमी म्हणजेच २२५ ते २५० रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून निर्मिती करण्यात येणारी ही लस उपलब्ध होण्यास पुढील वर्ष येईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.   

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातर्फे कोरोनावरील या लसीचे १०० मिलियन डोस तयार करण्यात येणार आहेत अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून देण्यात आली आहे. तसेच या लसीची निर्मिती झाल्यावर जागतिक आरोग्य संघटनाकडे पाठवण्यात येईल. परंतु त्यांची मान्यता मिळाल्यावरच लस बाजारात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवरील लस निर्मिती करण्यासाठी जगभरात २०० हून अधिक प्रकल्पांवर काम सुरू आहे. यापैकी २१ पेक्षा अधिक लसींच क्लिनिकल ट्रायल सुरू आहेत.