विरोधकांचं असं झालयं जिकडं खोबरं तिकडं चांगभलं : रुपाली चाकणकर

महविकास आघाडी सरकार हे विकास कामाच्या बाबतीत नेहमी तत्पर असते.परंतु हे विरोधकांच्या पोटात दुखण्यासारखे आहे.आघाडी सरकार हे तीन चाकी गाडी चे नसून ब्रह्मा, विष्णु, महेश तीन मुखी सरकार असून जनतेच्या नेहमी पाठीशी उभे असते.'जिकडे खोबर तिकडे चांगभल' अशी परिस्थिति सध्या इतर पक्षात पहावयास मिळत आहे.

    पारगाव : नानगाव ता.दौंड येथे (ता.१२) रोजी महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस कडून ५०% सवलतीच्या दरात पिठ गिरणी व वॉटर फिल्टर वाटप करण्यात आले.नानगाव-पारगाव रस्ता व पीएमआरडीए घरकुल योजना हे दोन विषय या कार्यक्रमात चांगलेच गाजले.

    रुपाली चाकणकर म्हणाल्या की,जागतिक महिला दिन हा एक दिवसासाठी साजरा न करता तो ३६५ दिवस साजरा करावा. महविकास आघाडी सरकार हे विकास कामाच्या बाबतीत नेहमी तत्पर असते.परंतु हे विरोधकांच्या पोटात दुखण्यासारखे आहे.आघाडी सरकार हे तीन चाकी गाडी चे नसून ब्रह्मा, विष्णु, महेश तीन मुखी सरकार असून जनतेच्या नेहमी पाठीशी उभे असते.’जिकडे खोबर तिकडे चांगभल’ अशी परिस्थिति सध्या इतर पक्षात पहावयास मिळत आहे.

    तसेच कार्यक्रमात अनेक महिलानी सहभाग नोंदवला होता.महिला दिनानिमित्त वॉटर फिल्टर व पिठ गिरणी ज्याना हवे आहेत अशा महिलांनी युवती राष्ट्रवादी कॉंग्रेस दौंड कार्याध्यक्ष अश्लेषा शेलार यांच्याकडे नोंदणी केली होती.सामाजिक कार्याची आवड असलेल्या शेलार यांनी ५०% सवलतीच्या दरात आज रुपाली चाकणकर यांच्या हस्ते या वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या.

    रमेश थोरात यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,आम्ही सर्व पुरूष आपल्या महिलाच्या समवेत आहोत.आपण नेहमी एक पाउल पुढे टाकून प्रगती करावी.अजित पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले होते विकास कामाच्या बाबतीत इंदापुर,बारामती व इतर तालुके हे अग्रेसर आहेत त्याला कारण ही तसेच आहे.परंतु आपल्या दौंड तालुक्याची काय परिस्थिति आहे हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे.दौंडचा विकास होत नसून भकास होत चालला आहे अशा कडक शब्दात यावेळी थोरात यांनी टिका केली.

    यावेळी कार्यक्रमात रमेश थोरात(अध्यक्ष,पीडीसीसी बँक, पुणे),अप्पासाहेब पवार(अध्यक्ष,राष्ट्रवादी कॉंग्रेस, दौंड),राणी शेळके(सदस्य, पुणे जिल्हा परिषद,पुणे),हेमलता फडके(सभापती,पंचायत समिती,दौंड),अश्लेषा शेलार(कार्याध्यक्ष, युवती राष्ट्रवादी कॉंग्रेस, दौंड),डॉ. वंदना मोहिते(डॉक्टर सेल,बारामती मतदार संघ),तुषार थोरात(युवा नेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस, दौंड),सयाजी ताकवने(उपसभापती, पंचायत समिती, दौंड),विशाल शेलार(मा.उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, दौंड),दिलीप हंडाळ(मा. सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती,दौंड),पूजा भुट्टे(जिल्हाध्यक्ष,युवती राष्ट्रवाद कॉंग्रेस,पुणे),सी.बी.खळदकर(सदस्य,ग्रा.पं,नानगाव),विश्वास भोसले(मा.सरपंच,ग्रा.पं, नानगाव),डी के खळदकर व आदि उपस्थित होते.