अशी असेल मुंबई-पुणे महामार्गावरील नवीन मार्गिका

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या नवीन मार्गिकेच्या बांधकामाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर प्रकल्प कॅम्प कार्यालयात सादरीकरणाद्वारे सुरु असलेल्या बांधकामाच्या कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची माहिती जाणून घेतली.

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या नवीन मार्गिकेच्या बांधकामाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर प्रकल्प कॅम्प कार्यालयात सादरीकरणाद्वारे सुरु असलेल्या बांधकामाच्या कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची माहिती जाणून घेतली. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली-कुसगाव दरम्यानच्या नवीन बांधकामाचे सादरीकरण त्यांच्यासमोर झाले आहे.मुंबई-पुणे महामार्गावरील नवीन मार्गिका खालील प्रमाणे असणार आहे.

कुसगाव ते सिंहगड कॉलेज, लोणावळा मिसिंक लिंक प्रोजेक्ट

-एकूण १८ किलोमीटरचा हा मिसिंक लिंक प्रोजेक्ट आहे

-कुसगाव अर्थात खालापूर टोल नाका ते खोपोली एक्झिट पर्यंतचा ५.८६ किमीचा मार्ग आठ पदरी होईल

-तिथून ‘व्हाया डक्ट’ हा ९०० मीटरचा पहिला पूल असेल

-पहिला पूल संपतो तिथून १.६ किमीचा पहिला बोगदा सुरू होईल

-पहिला बोगदा जिथे संपतो तिथून ‘केबल स्टेड’ नावाचा ६५० मीटर लांबी आणि १३५ मीटर उंचीचा दुसरा पूल, जो देशात पहिलाच पूल असेल.

-दुसरा पूल जिथं संपतो त्या नागफणी सुळक्या खालून ८.९ किमीचा दुसरा महाकाय बोगदा सुरू होईल. जो लोणावळ्यातील सिंहगड कॉलेज समोर संपेल.

-महाकाय दोन बोगदे आणि दोन पुलांचं आत्तापर्यंत २० टक्के काम पूर्ण झालंय.

-यासाठी ७०० कोटींचा खर्च झालाय.

-८.९ किमी अंतराच्या या बोगद्यातील एका मार्गिकेचं २ किमी तर दुसऱ्या मार्गिकेचं ५०० मीटरचे काम पूर्ण झालेलं आहे.

प्रकल्पाचा तपशील

-मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या लांबीतील नवीन मार्गिकेच्या (मिसिंग लिंक) प्रकल्पांतर्गत खालापूर पथकरनाका ते लोणावळा (सिंहगड संस्था) पर्यंत मुंबई पुणे द्रुतगती मार्गाची क्षमता वाढ करणे प्रस्तावित आहे.

-या प्रकल्पाची एकूण लांबी १९.८० कि.मी. असून या प्रकल्पांतर्गत खालापूर ते खोपोली इंटरचेंज या अस्तित्वातील ५.८६ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे ८ पदरीकरण करणे.

-खोपोली एक्झिट ते कुसगांव (सिंहगड संस्था) या भागातील १३.३ कि. मी. राहिलेल्या लांबीमध्ये दोन बोगदे व दोन व्हायाडक्ट बांधणे.

प्रकल्पाची गरज

-आडोशी बोगद्याजवळ मुंबई पुणे द्रुतगती मार्ग (६ लेन) व राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ (४ लेन) एकत्र येतात व खंडाळा एक्झीट येथे वेगळे होतात.

-आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झीट या लांबीत घाट व चढ उताराचे प्रमाण जास्त असून दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात वारंवार होत असतात, त्यामुळे मुंबईकडे येणारी डोंगरालगतची एक लेन ही पावसाळयात वाहतुकीसाठी बंद ठेवावी लागत असल्यामुळे वाहतूक कोंडी होते.

प्रकल्प बांधकाम सद्यस्थिती

-खोपोली एक्झीट ते कुसगाव (सिंहगड संस्था) या लांबीमध्ये ८ पदरी २ बोगद्यांसह नवीन रस्ता

-बोगदा क्र. २ एक्झिटच्या दोन समांतर बोगद्यांपैकी उजव्या बोगद्याचे १९७९ मीटर (मुंबईकडे) खोदकाम पूर्ण झाले असून डाव्या बोगद्याचे १५५२ मीटर (पुणेकडे) खोदकाम पूर्ण झाले आहे.

– बोगदा क्र. २ ला जोडणाऱ्या अडिट नंबर १ चे १३४० मीटर इतके खोदकाम पूर्ण झाले असून नंबर २ चे ११५३ मीटर इतके खोदकाम पूर्ण झाले आहे.

-बोगदा क्र. १ च्या पोर्टल पर्यंत पोचण्यासाठीच्या पोचरस्त्याचे काम सध्या प्रगती पथावर आहे.

-खोपोली एक्झीट ते कुसगाव (सिंहगड संस्था) या लांबीमध्ये ८ पदरी २ व्हायाडक्टसह नवीन रस्ता व खालापूर पथकर नाका ते खोपोली एक्झीट या रस्त्याचे ८ पदरीकरण करणे.

-सध्याच्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूर टोलनाका ते खोपोली एक्झिटचे ८ पदरीकरण करण्याचे काम प्रगती पथावर आहे. या ८ पदरीकरणांतर्गत येणाऱ्या मेजर ब्रिज नं. १. २ व ३ या तीनही पुलांचे रुंदीकरणाचे काम प्रगती पथावर आहे.

-व्हायाडक्ट क्र. १ च्या पायाभरणीचे काम देखील प्रगती पथावर आहे.

-व्हायाडक्ट क्र. २ च्या आखणीपर्यंत पोचवण्यासाठीच्या पोचरस्त्यासाठी इतर काम पूर्ण झाले असून पोचरस्ता बांधकाम सद्यस्थितीत प्रगती पथावर आहे.

-मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग (मिसिंग लिंक)

■ मुंबई पुणे द्रुतगती मार्ग (मिसिंग लिंक) प्रकल्पांतर्गत सध्याच्या द्रुतगती मार्गावरील खालापूर ते खोपोली इंटरचेंज या ५.८६ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे ८ पदरीकरण होणार आहे.

■ खोपोली एक्झिट ते कुसगांव (सिंहगड संस्था) या भागातील १३.३ कि. मी. च्या राहिलेल्या लांबीसाठी दोन बोगदे (अनुक्रमे १.६८ कि.मी. व ८.८७ कि.मी.) व दोन व्हायाडक्टचे (अनुक्रमे ०.९०० कि.मी. व ०.६५० कि.मी.) बांधकाम करण्यात येणार आहे.

■ या प्रकल्पामुळे सध्याचे खोपोली एक्झिट ते सिंहगड संस्था हे १९ कि.मी. चे अंतर ६ कि.मी. ने कमी होवून १३.३ कि.मी. इतके होईल व प्रवासाच्या वेळेत २० ते २५ मिनिटांची बचत होण्यास मदत होणार आहे.

■ या प्रकल्पास ४ जून २०१९ रोजी वन विभागामार्फत मान्यता देण्यात आली आहे.

■ या प्रकल्पास २४ ऑगस्ट २०१८ रोजी राज्य पर्यावरण समितीमार्फत मान्यता देण्यात आली आहे.

■ या प्रकल्पांतर्गत पॅकेज १ करीता (बोगद्याचे काम) मे. नवयुगा इंजिनिअरींग कं. लि. यांना २१ फेब्रुवारी २०१९ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे.

■ या प्रकल्पांतर्गत पॅकेज २ करीता (व्हायाडक्टचे काम) मे. एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि. यांना १ मार्च २०१९ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे.

■ पॅकेज १ व पॅकेज २ चे काम डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करणे नियोजित आहे.

■ या प्रकल्पाची एकूण किंमत रु.६६९५.३७ कोटी इतकी आहे.