शिवसेनेला भाेपळा मिळाल्याची टिका करणाऱ्यांनी ‘त्यांना’ मतदारांनी का डावलले याचा विचार करावा- डॉ.नीलम गोऱ्हे

महाविकास आघाडीच्या राज्य सरकारमुळे कोंडलेल्या लोकशाहीला मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली

 

पुणे : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषद निवडणुकीतील अपयश झाकण्यासाठी शिवसेनेवर टीका करण्याचा प्रकार म्हणजे केविलवाणी धडपड अाहे. शिवसेनेला भाेपळा मिळाल्याची टिका करणाऱ्यांनी मतदारांनी का डावलले याचा विचार करावा अशी प्रतिक्रीया शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.
पत्रकार परिषदेत डाॅ. गाेऱ्हे यांनी  विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदार संघ आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या निकालाविषयी प्रतिक्रीया व्यक्त केली. ‘‘ महाविकास आघाडीच्या राज्य सरकारमुळे कोंडलेल्या लोकशाहीला मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली आहे. त्याचे पुढचे पाऊल म्हणजे हे निकाल आहेत .  नागपूर आणि पुणे येथील जागा भाजपकडे हाेत्या, तरीही येथे आघाडीला यश मिळाले आहे.
अमरीश पटेल यांचे  स्वतःचे कार्य असल्यामुळे त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला(BJP) झालेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एककलमी  विरोधासाठी विरोध हा कार्यक्रम विराेधकांनी राबविला हाेता. शिवसेनेला या निवडणुकीत भाेपळा मिळाला अशी टि का करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी मतदारांचा विश्वास का गमाविला याचा विचार करावा.  केवळ शिवसेनेच्या बद्दलच्या द्वेष भावनांनी टिका करणे,  वेगवेगळे जे सल्ले देऊन जनतेची दिशाभुल करण्याचा प्रकार आहे.  शिवसेनेने एकटे लढले पाहिजे असे म्हणणे म्हणजे स्वतःचे अपयश झाकण्यासाठी केलेली ही केविलवाणी धडपड आहे. मुंबई, पुणे (Pune )महानगरपालिका आणि जिल्हा परिषद,  पंचायत समिती या सगळ्या निवडणुकांमध्ये अशा प्रकारची आमची घोडदौड चालू राहील’’  अशी खात्री गाेऱ्हे यांनी व्यक्त केली.