मास्क न घालणाऱ्या नागरिकांना आता भुर्दंड; ”या” शहरात कारवाई सुरु

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण जगात होत आहे. तसेच देशाबरोबरच राज्यात सुद्धा कोरोना कमी होण्याचं नावं घेत नाहीये. तसेच मुंबई पाठोपाठ आता पुणे जिल्ह्यातही कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहे.

 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण जगात होत आहे. तसेच देशाबरोबरच राज्यात सुद्धा कोरोना कमी होण्याचं नावं घेत नाहीये. तसेच मुंबई पाठोपाठ आता पुणे जिल्ह्यातही कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पालिकेनं कठोर निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. सार्वजनिक ठिकाणी किंवा बाहेर काही कामानिमित्त जाताना, विना मास्क आढळल्यास कठोर पाऊल उचलून, नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी सांगितलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक ठिकाणी विना मास्कचं आढळल्यास, नागरिकांकडून ५०० ते १००० रूपये पर्यंतचा दंड आकारला जाणार असल्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत २००५ अन्वये कारवाई केली जाणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी प्रचंड गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव अतिरिक्त प्रमाणात होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून वारंवार सूचना दिल्या जात आहे. परंतु या परिस्थितीत काही नागरिक या आदेशाचं पालन करताना दिसत नाहीयेत. त्यामुळे प्रशासनाने आता कठोर पाऊलं उचलली आहेत.