सूर्याकडे पाहून थुंकी उडवणाऱ्यांना कदाचित माहिती नसेल; लांडे यांनी विरोधकांच्या सूडबुध्दीचे काढले वाभाडे

तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव आणि राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या कार्यकाळात शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेण्यासाठी अनुकूल ठिकाणी क्रिडा मैदान तयार करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. त्यावेळी पवारसाहेबांनी महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत ही दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिडा मैदान तयार करण्यासाठी पुण्यातील बालेवाडी येथे जागा उपलब्ध करून दिली.

    पिंपरी: बालेवाडीतील आंतरराष्ट्रीय क्रिडा विद्यापीठात उभारण्यात आलेल्या ‘सिंथेटिक ट्रॅक’वर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गाड्यांचा ताफा गेल्यामुळे विरोधकांनी स्वतःला क्रिडा क्षेत्रातील तज्ञ माणून निषेध व्यक्त करत स्वतःचे अज्ञान चव्हाट्यावर आणले आहे. क्रिडा विश्वाची विशेष आवड असल्याने शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिडा विद्यापीठ पुणे शहरात आणले. याच्या माध्यमातून पुण्यात क्रिडा विश्वाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्याकडून क्रिडा नियमांचं उल्लंघन कदापी होणार नाही. कारण, पवारसाहेबांनी कित्येक वर्षे ‘आयसीसी’च्या अध्यक्ष पदावर राहून क्रिडा क्षेत्राचा देशभरातच नव्हे तर देशाच्या बाहेरसुध्दा विस्तार केला आहे. त्यांच्या पायाला जखम झाल्यामुळे क्रिडा आयुक्तांनीच त्यांच्या गाड्यांच्या ताफ्याला ‘सिंथेटिक ट्रॅक’वर प्रवेश करण्याची परवानगी दिली. त्यामुळे या शूल्लक बाबीचा निषेध करणा-या विरोधकांच्या सूडबुध्दीची किव येते, अशा शब्दांत माजी आमदार विलास लांडे यांनी विरोधकांचे वाभाडे काढले आहे.

    क्रिडा क्षेत्राची जाण नसणाऱ्यांनी स्वतःची कुवत ओळखून बोलावे

    बालेवाडी येथील स्टेडिअयच्या धावपट्टीवर गाड्यांचा ताफा गेल्यामुळे पवारसाहेबांवर विरोधकांनी टिका करणे म्हणजे सूर्याकडे पाहून थुंकी उडवण्यासारखे आहे. ती थुंकी स्वतःच्या तोंडावर पडणार हे विरोधकांना कदाचित माहिती नसावे. क्रिडा क्षेत्रात आपले शून्य योगदान असल्याची जाणीव विसरलेल्या विरोधी पक्षाच्या पदाधिका-यांनी स्वतःची कुवत ओळखून बडबड करावी. नको तिथे आपली बुध्दी पाजळण्याचा उद्योग केल्यास स्वतःलाच तोंडघशी पडावे लागणार आहे. याचा निषेध करणे म्हणजे स्वतःचे अज्ञान चव्हाट्यावर आणण्याचाच प्रकार आहे. क्रिडा विश्वाला गती देणारा व्यक्ती क्रिडाविषयक नियमांचे उल्लंघन कसे करू शकेल, हे विरोधकांना सांगून कळणार नाही. एवढे न समजण्याइतपत विरोधक अज्ञानी असतील याची कल्पना मनाला न पटणारी आहे. केवळ पायाला जखम झाल्यामुळे पवारसाहेबांनी सिंथेटिक ट्रॅकवरती गाड्यांच्या ताफ्याला परवानगी मागितली होती. त्यावर क्रिडा आयुक्तांनी परवानगी दिल्यानंतरच गाड्यांचा आतमध्ये प्रवेश झाला. याचा निषेध करणे म्हणजे राजकीय सूडबुध्दीतून सूचलेले विकृत शहानपण म्हणावे लागेल, अशी टिका लांडे यांनी केली आहे.

    तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव आणि राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या कार्यकाळात शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेण्यासाठी अनुकूल ठिकाणी क्रिडा मैदान तयार करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. त्यावेळी पवारसाहेबांनी महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत ही दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिडा मैदान तयार करण्यासाठी पुण्यातील बालेवाडी येथे जागा उपलब्ध करून दिली. तो प्रस्ताव तातडीने मंजूर करून तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी कामाला गती दिली. पवारसाहेबांनी स्वतः लक्ष घालून याठिकाणी भव्यदिव्य असे आंतरराष्ट्रीय क्रिडा मैदान तयार केले. त्यावेळी मी पिंपरी-चिंचवडचा महापौर असताना महापालिकेच्या माध्यमातून स्टेडियमच्या कामासाठी लागणारे सहकार्य केले. मी आणि तत्कालीन आयुक्त श्रीनिवास पाटील आम्ही दोघांनी स्टेडियमच्या बांधकामासाठी पाण्याची व्यवस्था करून दिली. पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था कशी करता येईल, याचा विचार करून तो प्रश्न सोडवला. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिडा स्पर्धा होत असताना खेळाडूंना लागणा-या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पवारसाहेबांच्या मार्गदर्शनानुसार सहकार्य केले. आज याठिकाणी होणा-या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिडा स्पर्धांपासून राज्यातील असंख्य खेळाडूंना प्रेरणा मिळते. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील शेकडो खेळाडू घडवण्यासाठी हे स्टेडियम प्रेरणादायी ठरत आहे, असे लांडे यांनी म्हटले आहे.