खंडणीसाठी खाजगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पैसे न दिल्यास त्यांच्या मोबाईल मधील डेटा डिलीट करून खाजगी फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली. पोलिसात तक्रार दिल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील धमकी देणाऱ्या मंगेश नथुराम रेणुसे (वय २४) तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पिंपरी: दहा हजारांची खंडणी न दिल्यास खाजगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या मंगेश नथुराम रेणुसे (वय २४) तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार निगडी परिसरात घडला.  संतोष रतन शिंदे वय ३९,रा. निगडी यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मंगेश याने फिर्यादी शिंदे यांचा मोबाईल फोन चोरला. तो परत देण्यासाठी दहा हजार रुपयांची खंडणी मागितली. फिर्यादी यांनी पैसे न दिल्यास त्यांच्या मोबाईल मधील डेटा डिलीट करून खाजगी फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली. पोलिसात तक्रार दिल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिली. आरोपीने फिर्यादी यांच्याकडून ५०० रुपये गुगल पेद्वारे स्वीकारले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.