गांजाची तस्करी करणारी तिघेजण अटकेत

वाघोलीत मोटारीतून गांजा तस्करी होणार असल्याची माहिती पोलीस अमंलदार नितीन जगदाळे आणि युवराज कांबळे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले.

    पुणे: वाघोली परिसरात गांजाची तस्करी करण्यासाठी आलेल्या तिघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्यांच्याकडून लाखो रुपयांचा गांजा जप्त करण्या: शहरात आला आहे. अक्षय बिडगर, सोनल काळे आणि सागर पोले अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

    वाघोलीत मोटारीतून गांजा तस्करी होणार असल्याची माहिती पोलीस अमंलदार नितीन जगदाळे आणि युवराज कांबळे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४ लाख ३० हजार रूपये किंमतीचा तब्बल २२ किलो गांजा आणि मोटार मिळून ६ लाख ८० हजारांचा ऐवज जप्त केला. संबंधिताविरूद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनाविली आहे.

    पुणे-नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात तिघेजण गांजा तस्करीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या मोटारीत २२ किलो गांजा आढळून आला आहे