crime

शिक्रापूर : शिक्रापूर ता. शिरूर परिसरात दुचाकीहून हत्यारे घेऊन फिरणाऱ्या तिघांना दुचाकी व हत्यारे घेऊन फिरणाऱ्या तिघांना जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले असून तिघांवर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.

शिक्रापूर ता. शिरूर पाबळ चौकामध्ये पोलीस शिपाई मिलिंद देवरे हे त्यांच्या काही सहकाऱ्यांसोबत नाकाबंदी करत असताना त्यांना एका बिगर नंबरच्या दुचाकीहून तीन संशयित युवक आल्याचे दिसून आले, यावेळी पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे पोलीसांना संशय आल्याने त्यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांच्या जवळ एक कोयता, एक कुऱ्हाड तसेच एक पक्कड मिळून आली. यावेळी पोलिसांनी त्यांना दुचाकी व हत्यारासह ताब्यात घेतले, याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई मिलिंद दिलीप देवरे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अनिकेत अर्जुन मंडलिक वय २० वर्षे रा. पाषाण सोमेश्वरवाडी पुणे, अजित रावसाहेब थोरात वय २० वर्षे रा. विघ्नहर्ता कॉलनी शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे, निवृत्ती उर्फ विराज ज्ञानोबा येमघर रा. पाषाण सोमेश्वरवाडी पुणे मूळ रा. मंजरत ता. माजलगाव जि. बीड या तिघांवर गुन्हे दाखल करत तिघांना अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर हे करत आहे.