जम्बो कोवीड सेंटरला तीन महिने मुदतवाढ ; सेंटर गरजेनुसार पुन्हा सुरू करण्यात येणार

पुणे शहरासह जिल्ह्याला करोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेचा फटका बसला होता. दुसर्‍या लाटेत रुग्णालयात बेड मिळणेही मुश्कील झाले होते. या काळात शिवाजीनगर येथील सीओईपीच्या मैदानाव उभारण्यात आलेल्या जम्बो कोवीड सेंटरची चांगली मदत झाली. या सेंटरमध्ये ६०० ऑक्सिजन बेड, १०० आयसीयू बेड व २०० एचडीयू बेड आहेत. यापूर्वी ३० जून पर्यंत सेंटरला मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी ९ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली.

    पुणे : कोरोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेत वरदान ठरलेल्या शिवाजीनगर येथील जम्बो कोवीड सेंटरला संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. हे सेंटर गरजेनुसार पुन्हा सुरू करण्यात येणार असून ते सुरू झाल्यापासून पुढे तीन महिने वाढ देण्यात येणार असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले आहे.

    पुणे शहरासह जिल्ह्याला करोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेचा फटका बसला होता. दुसर्‍या लाटेत रुग्णालयात बेड मिळणेही मुश्कील झाले होते. या काळात शिवाजीनगर येथील सीओईपीच्या मैदानाव उभारण्यात आलेल्या जम्बो कोवीड सेंटरची चांगली मदत झाली. या सेंटरमध्ये ६०० ऑक्सिजन बेड, १०० आयसीयू बेड व २०० एचडीयू बेड आहेत. यापूर्वी ३० जून पर्यंत सेंटरला मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी ९ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली. दुसरी लाट ओसरल्यानंतर हे सेंटर बंद करण्यात आले आहे. जम्बोच्या स्ट्रक्चरचे ऑडिटदेखील करण्यात आले असून हे सेंटर जानेवारी २०२२ अखेरपर्यंत वापरास योग्य असल्याचा दिल्ली आयआयटीने अहवाल दिला आहे.

    दरम्यान, तज्ज्ञांनी करोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर जम्बोमधील सेवा देणार्‍या खासगी संस्थेला तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहेत. ज्यावेळी शहरातील रुग्ण संख्या वाढेल, त्यावेळी जम्बोतील प्रवेश पुन्हा सुरू केले जाणार आहेत. प्रवेश सुरू झालेल्या तारखेपासून पुढे तीन महिने मुदवाढ देण्यात येणार असल्याचे रासने यांनी सांगितले.