वेल्हयात आढळले तीन नवीन कोरोनाबाधित रूग्ण

एकोणीस जणांचे अहवाल प्रलंबित भोर : वेल्हे तालुक्यातील वडगांव झांजे येथे बुधवारी करोना बाधीत तीन नवीन रूग्ण सापडले असून त्यांच्यावर पुणे येथील रूग्णालयांत उपचार सुरू असल्याचे उपविभागीय अधिकारी

एकोणीस जणांचे अहवाल प्रलंबित

 भोर : वेल्हे तालुक्यातील वडगांव झांजे येथे बुधवारी करोना बाधीत तीन नवीन रूग्ण सापडले असून त्यांच्यावर पुणे येथील रूग्णालयांत उपचार सुरू असल्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी सांगीतले.अदयाप एकोणीस जणांचे तपासणी अहवाल प्रलंबित आहेत.वडगांव झांजे येथील पुण्यात उपचार सुरू असलेल्या रूग्णांची संख्या आता सहा झाली आहे.नवीन रूग्ण सापडल्यामुळे प्रशासनाची पळापळ झाली आहे.प्रशासनाने तालुक्याच्या सिमा सील करून कडेकोट बंदोबस्त ठेवला असला तरी छुप्या मार्गाने रेड झोन असलेल्या पुणे मुंबईतून येणारे नागरिक, तर काहीजण अजूनही पुण्यातून नोकरीसाठी येजा करणारे कर्मचारी याकामी त्रासदायक ठरत असल्याचा स्थानिक नागरिक करीत आहेत.वेल्हे तालुक्यात अनेक मूलभूत सुविधा, सुसज्ज आरोग्य सेवेचा अभाव आहे.त्यामुळे वस्तूंच्या खरेदीसाठी,आरोग्य सेवेसाठी नागरिक,भोर तालुक्यातील नसरापूर अथवा पुण्यात जातात. दुर्गम भागांत नागरिक गप्पांसाठी जमा होतात,मुले खेळासाठी जमा होतात. तालुक्यातील रूग्णांची साखळी वाढत असल्याचे चित्र आहे.

भोरमध्ये नवा रूग्ण नाही  

तालुक्यातील भोंगवली येथील रूग्णांचा तपासणी अहवाल निरंक आला आहे.तसेच गेल्या नउ दिवसांत एकही नवा रूग्ण आढळला नसल्याचे तालुका वैदयकीय अधिकारी डॉ.सुनिल क-हाळे यांनी सांगितले.नसरापूरच्या दोन रूग्णांवर आठ दिवसांपासून पुण्यात उपचार सुरू आहेत.