बाळाच्या संपर्कातील तिघेजण निगेटिव्ह

केडगाव, बोरीपार्धीकरांचा जीव भांड्यात दौंड : तालुक्‍यातील केडगाव, बोरीपार्धी येथील १३ महिन्यांच्या कोरोना पॉझिटिव्ह बाळाचा सांभाळ करणाऱ्या तिघांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने केडगाव,

केडगाव, बोरीपार्धीकरांचा जीव भांड्यात
दौंड :
तालुक्‍यातील केडगाव, बोरीपार्धी येथील १३ महिन्यांच्या कोरोना पॉझिटिव्ह बाळाचा सांभाळ करणाऱ्या तिघांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने केडगाव, बोरीपार्धीकरांचा जीव भांड्यात पडला आहे.
येथील एका सोसायटीत राहणाऱ्या बाळाचा कोरोना अहवाल काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याचा सांभाळ करणारे त्या घरातील लोक कोरोनाच्या रडारवर होते. त्या बाळाचे आई-वडिलांनी येऊन त्याला घेऊन गेल्यानंतर सांभाळ करणाऱ्या घरातील तीन जणांची तपासणी करण्यात आली.शुक्रवारी (दि.१९) त्या तिघांचा अहवाल प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह आल्याने केडगाव, बोरीपार्धी परिसरातील नागरिकांचा जीव भांड्यात पडला. दरम्यान, दौंड तालुक्‍यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढत चालली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःची काळजी घ्यावी, अफवांवर विश्‍वास ठेऊ नये, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे यांनी आवाहन केले आहे.