रांजणगाव येथे तीन जण आढळले कोरोना पॉझिटिव्ह

रांजणगाव : रांजणगाव गणपती येथील एक महिन्यांपासून वास्तव्यास असलेल्या तीन जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली. यामुळे रांजणगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

रांजणगाव : रांजणगाव गणपती येथील एक महिन्यांपासून वास्तव्यास असलेल्या तीन जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली. यामुळे रांजणगाव परिसरात खळबळ उडाली आहे. राजेंद्र शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तीन रुग्णांपैकी एक जण मुलुंड व दोन पुण्यातील घोरपडी येथून रांजणगाव येथे महिन्यापूर्वी वास्तव्यास आले होते. मात्र रविवारी यातील एका रुग्णाला अचानक त्रास होऊ लागल्याने तपासणीसाठी पुणे येथे नेले असता तिघांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याचे त्यांनी सांगितले.

रांजणगाव येथील रुग्ण ज्या परिसरामध्ये वास्तव्यास आहेत. त्या परिसरात ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने औषध फवारणी करून आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका व ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी किसन बिबे यांनी सांगितले. या करोना पॉझिटिव रुग्णांमध्ये आई, मुलगा व त्याची मावशी अशा तीन जणांचा समावेश आहे. साधारण एक महिन्यापूर्वी पुणे व मुंबईवरून रांजणगाव येथे वास्तव्यास आले होते. यातील एका महिलेची याठिकाणी खोली असून त्या खोलीमध्ये त्यांनी एक महिनाभर वास्तव्य केले होते. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतचे सरपंच सर्जेराव खेडकर यांनी केले आहे.