पुण्यातील तीन खासगी लॅब सील; महापािलका प्रशासनाचे आदेश

काेराेना चाचणी करणाऱ्या व्यक्तीची माहीती या खासगी लॅबकडून आवश्यक माहीती बिनचुकपणे आणि नियाेजित वेळेत देणे बंधनकारक आहे. काही खासगी लॅबकडून अपुर्ण माहीती मिळत हाेती. त्यामुळे महापािलकेच्या आराेग्य विभागाने संबंधित लॅबला नाेटीस पाठविली हाेती. तसेच महापािलकेकडून त्यांना वेळाेवेळी ताेंडी आणि फाेनद्वारे सुचनाही केल्या हाेत्या. तरीही त्यांच्या कार्यपद्धतीत बदल न झाल्याने या लॅब सील करण्याचा आदेश अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी काढला आहे.

    पुणे: काेराेना चाचणी केलेल्या व्यक्तीची सविस्तर माहीती न भरणाऱ्या तीन खासगी लॅब सील करण्यात येणार आहे. यासंदर्भातील आदेश महापािलका प्रशासनाने साेमवारी काढले आहेत. क्रस्ना लॅब, मेट्राेपाेलिस लॅब, सबरबन डायग्नाेस्टीक सेंटर या तीन खासगी लॅबचा यात समावेश आहे. महापािलकेकडून काेराेना बाधित रुग्णांचा अहवाल राज्य सरकारला प्रतिदिन पाठविला जाताे. हा अहवाल एका विहीत नमुन्यात पाठविला जात असुन, यामध्ये आवश्यक माहीती ही मान्यताप्राप्त लॅबकडून संकलित केली जाते.

    काेराेना चाचणी करणाऱ्या व्यक्तीची माहीती या खासगी लॅबकडून आवश्यक माहीती बिनचुकपणे आणि नियाेजित वेळेत देणे बंधनकारक आहे. काही खासगी लॅबकडून अपुर्ण माहीती मिळत हाेती. त्यामुळे महापािलकेच्या आराेग्य विभागाने संबंधित लॅबला नाेटीस पाठविली हाेती. तसेच महापािलकेकडून त्यांना वेळाेवेळी ताेंडी आणि फाेनद्वारे सुचनाही केल्या हाेत्या. तरीही त्यांच्या कार्यपद्धतीत बदल न झाल्याने या लॅब सील करण्याचा आदेश अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी काढला आहे. खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोना चाचणी करणाऱ्या व्यक्तींचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आदी माहिती तपशीलवार नोंदवली जात नाही. या पैकी एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यास त्रोटक माहितीमुळे त्यांच्याशी संपर्क साधण्यास; तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्ती शोधण्यात अनेक अडचणी येत आहेत.

    त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात खासगी प्रयोगशाळा चालकांची बैठक घेऊन, कोरोना चाचणी करणाऱ्या व्यक्तींची संपूर्ण माहिती नोंदवून २४ तासांच्या आत महापालिकेकडे पाठविण्याच्या सूचना केल्या होत्या. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या आठ पॅथॉलॉजी लॅबचालकांना महापालिकेने गेल्या आठवड्यात नोटीस बजावून परवाना रद्द करण्याचा इशाराही दिला होता. मात्र, त्यानंतरही प्रयोगशाळांकडून कोरोना चाचणी करणाऱ्या व्यक्तींची माहिती उशिराने आणि अपुरी पाठवली जात आहे. त्यामुळे महापालिकेने तीन प्रयोगशाळा सील करण्याची कारवाई केली आहे.

    ‘पुणे’ एवढाच पत्ता नमूद…
    प्रयोगशाळेत चाचणी केलेल्या रुग्णांची माहिती आवश्यक नमुन्यात वेळेत मिळत नाही; तसेच काही रुग्णांचे पत्ते अपूर्ण असून, काही ठिकाणी फक्त ‘पुणे’ एवढाच पत्ता नमूद केलेला असतो. अपूर्ण पत्त्यांमुळे रुग्णांना शोधताना क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ वेळेत पूर्ण होऊ शकत नाही. परिणामी रुग्णांची संख्या वाढू शकते. ही बाब गंभीर आहे, अशी चिंता महापालिका प्रशासनाने प्रयोगशाळांना पाठविलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.