पुण्यात पिस्तुलधारी तरुण अन रिक्षा चालकांमध्ये थरार

समीर हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. तर समीर हे रिक्षा चालक आहेत. दरम्यान सोमवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या रिक्षातील पेट्रोल संपले होते. त्यामुळे ते येथील धावडे पेट्रोल पंपासमोर रिक्षा थांबवून बाटलीने रिक्षात पेट्रोल टाकत होते. यावेळी दोघे दुचाकीवरून जात असताना त्यांनी रिक्षाला धडक दिली. यामुळे समीर यांनी त्यांना जाब विचारला. त्यावेळी शिवीगाळ करत कंबरेला लावलेले पिस्तुल काढले

    पुणे : पिस्तुल धारी तरुण अन रिक्षा चालकाचा किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर घडलेल्या थराराने परिसर हादरून गेला आहे. एखाद्या चित्रपटासारखा हा प्रसंग असल्याचे नागरिक सांगत असून, दोघे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.याप्रकरणी संदीप मोहन सावंत (वय २६ ) व स्वरूप संगपाल आवटे (वय १९, रा. उत्तमनगर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत समीर घुगे (वय २८) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. तर समीर हे रिक्षा चालक आहेत. दरम्यान सोमवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या रिक्षातील पेट्रोल संपले होते. त्यामुळे ते येथील धावडे पेट्रोल पंपासमोर रिक्षा थांबवून बाटलीने रिक्षात पेट्रोल टाकत होते. यावेळी दोघे दुचाकीवरून जात असताना त्यांनी रिक्षाला धडक दिली. यामुळे समीर यांनी त्यांना जाब विचारला. त्यावेळी शिवीगाळ करत कंबरेला लावलेले पिस्तुल काढले आणि थेट समीर यांच्या छातीवर रोखले. अचानक पिस्तुल पाहून समीर घाबरून गेले. त्यांनी थेट पोलीस ठाण्याकडे पळ काढला. यावेळी हे आरोपी हातात पिस्तुल घेऊन त्यांच्या पाठीमागे धावू लागले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. नागरिक देखील भिती पोटी चिडीचूप होते. त्यानंतर रिक्षा चालकाला गाठत पिस्तुल रोखून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच जमलेल्या नागरीकांना शिवीगाळ करत दहशत निर्माण केली. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच त्यांनी येथे धाव घेतली. तसेच या दोघांना अटक केली. त्यांनी हे पिस्तुल कोठून आणले याबाबत चौकशी सुरू आहे. त्यांना न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.