बारामती तालुक्यात वादळी पाऊस ; फळबागांसह इतर पिकांचे नुकसान

बारामती शहर व तालुक्यात रविवारी (दि २) दुपारी सव्वाचारच्या सुमारास विजांच्या कडकडाटात वादळी पावसाने सुरुवात केली. बारामती शहर व परिसरात तसेच इंदापूर तालुक्यातील बहुतांशी भागात या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे द्राक्ष यासह कडवळ व इतर पीकांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले.

    बारामती : बारामतीसह इंदापूर तालुक्यात वादळी पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटात वादळी पावसाने बहुतांश भागात हजेरी लावली, त्यामुळे फळबागांसह इतर पिकांचे होण्याची शक्यता आहे.

    बारामती शहर व तालुक्यात रविवारी (दि २) दुपारी सव्वाचारच्या सुमारास विजांच्या कडकडाटात वादळी पावसाने सुरुवात केली. बारामती शहर व परिसरात तसेच इंदापूर तालुक्यातील बहुतांशी भागात या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे द्राक्ष यासह कडवळ व इतर पीकांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. अगोदरच कोरोनामुळे शेतमालाचे भाव पडले आहेत, त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. आज झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आणखी नुकसान झाले आहे. दरम्यान रात्रीपासून प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.