निमगाव केतकी परीसरात वादळी पाऊस ; झाडे उन्मळून पडल्याने बारामती- इंदापूर मार्गावरील वाहतूक ठप्प

निमगाव केतकी,गोतोंडी, अंथूर्णे परीसरात राज्य मार्गावर झाडे उन्मळून पडली, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. निमगाव केतकी मध्ये राज्यमार्गावरील ग्रामस्थांनी बाजूला ‌केले,मात्र गोतोंडी परीसरातील मार्गावरील झाड दूर करण्यासाठी उशिर ‌झाला, त्यामुळे वाहतूक बराच वेळ ठप्प झाली.लिंबू किती परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला.

    बारामती: इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी,गोतोंडी परीसरातवादळी पावसामुळे बारामती इंदापूर राज्यमार्गावर झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक बराच वेळ ठप्प झाली. गुरुवारी (दि २७ ) दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह निमगाव केतकी,गोतोंडी या परीसरात मुसळधार पाऊस झाला.

    निमगाव केतकी,गोतोंडी, अंथूर्णे परीसरात राज्य मार्गावर झाडे उन्मळून पडली, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. निमगाव केतकी मध्ये राज्यमार्गावरील ग्रामस्थांनी बाजूला ‌केले,मात्र गोतोंडी परीसरातील मार्गावरील झाड दूर करण्यासाठी उशिर ‌झाला, त्यामुळे वाहतूक बराच वेळ ठप्प झाली.लिंबू किती परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या भागातील ऊस मका व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.