आषाढी वारीसाठी कडेकोट बंदोबस्त ; देहूत दिंड्यांना बंदी तर आळंदी पालखी सोहळ्यात ४०० पोलिस तैनात

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरामध्ये व बाहेर तीन टप्प्यांत नाकाबंदी व बॅरिकेडिंग करण्यात येणार आहे. मंदिरालगत, प्रदक्षिणा रस्ता, आळंदी शहराबाहेरील ठिकाणी नाकाबंदी असेल.

    देहू : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी सोहळ्यानिमित्त पायी वारीस बंदी केली आहे. या पार्श्वभूमीवर देहत दिंड्यांना बंदी केली आहे. दि. २८ जूनपासून ४ जुलैपर्यंत ही बंदी लागू करण्यात आली आहे.या ठिकाणी एकत्र येण्यास, फिरण्यास बंदी राहणार आहे. या काळात येथील मठ, भक्तनिवास, हॉटेल, पासधारक वारकरी वगळता अन्य कोणालाही थांबता येणार नाही. येत्या एक जुलै रोजी संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. सोहळ्यात शंभर वारकरी घेऊन सोहळा पूर्ण करता येणार आहे.

    त्यानंतर पादुकांचा मुक्काम त्याच ठिकाणी १८ जुलैपर्यंत राहील. १९ जुलै रोजी ४० वारकऱ्यांच्या उपस्थितीत या पादुका एसटीने देहूकडे प्रयाण करतील.देहूतील संचारबंदीचे नियम ०२८ जून ते ४ जुलैसंचारबंदी लागू असलेली गावे• देह नगरपंचायत, देहरोड कॅन्टोन्मेंट. येलवाडी, माळवाडी, तळवडे, चिंचोली, सांगुर्डी. वाहतुकीस बंदी• यात्राकाळात वाहतुकीस.आणि गावात प्रवेशास वाहनांना तसेच दुचाकी, चारचाकी वाहनांना सक्त मनाई आहे. इंद्रायणी स्नानास बंदी • पायी वारी सोहळ्यानिमित्त देहत नदीच्या पाण्यात वारकऱ्यांना स्नानास तसेच यंदा २८ जून ते १४ जुलैदरम्यान बंदी आहे त्यामुळे नदीत स्नानास, हातपाय धुण्यास बंदी लावण्यात आली आहे.

    संत ज्ञानेश्वर पादुकाचे शुक्रवारी प्रस्थान आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पादुका प्रस्थान सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने कडेकोट सुरक्षाव्यवस्था पुरवली आहे. परंपरेनुसार शुक्रवारी (दि. २) पादुकांचे प्रस्थान होणार आहे. यासाठी जवळपास चारशे पोलिस आळंदीत तैनात असणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सोमवार (दि. २८) पासूनच आळंदीत बंदोबस्त लावण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये ५० पोलिस अधिकारी, २१० पोलिस अंमलदार, ९० होमगार्ड, राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या, बॉम्बशोधक व नाशक पथक, घातपातविरोधी पथक यांचा समावेश आहे.

    असा असेल बंदोबस्त
    संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरामध्ये व बाहेर तीन टप्प्यांत नाकाबंदी व बॅरिकेडिंग करण्यात येणार आहे. मंदिरालगत, प्रदक्षिणा रस्ता, आळंदी शहराबाहेरील ठिकाणी नाकाबंदी असेल.