टिकटॉक स्टारची आत्महत्या, या कारणामुळे आयुष्य संपवल्याचा संशय

टिकटॉक स्टार समीर गायकवाडनं राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. अनेक लोकप्रिय व्हिडिओच्या माध्यमातून ओळखल्या जाणाऱ्या समीरच्या आत्महत्येमागे प्रेमप्रकरण असल्याची चर्चा आहे. रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली. समीरच्या कुटुंबीयांसह त्याच्या मित्रमंडळींना आणि चाहत्यांनाही यामुळे धक्का बसलाय. 

    टिकटॉक स्टार समीर गायकवाडने आत्महत्या केल्यामुळे सध्या एकच खळबळ उडालीय. टिकटॉकवरील विविध व्हिडिओच्या माध्यमातून लोकप्रिय झालेल्या समीरनं अचानक आत्महत्येचं पाऊल उचलल्यामुळं आश्चर्य आणि दुःख व्यक्त होतंय.

    टिकटॉक स्टार समीर गायकवाडनं राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. अनेक लोकप्रिय व्हिडिओच्या माध्यमातून ओळखल्या जाणाऱ्या समीरच्या आत्महत्येमागे प्रेमप्रकरण असल्याची चर्चा आहे. रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली. समीरच्या कुटुंबीयांसह त्याच्या मित्रमंडळींना आणि चाहत्यांनाही यामुळे धक्का बसलाय.

    समीर याचा भाऊ प्रफुल्ल गायकवाड यांनी लोणीकंद पोलिसांना याची माहिती दिली. समीरने गळफास लावल्याचे समजल्यावर त्याला तातडीने खाली उतरवण्यात आले आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र लाईन लाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

    आत्महत्येपूर्वी लिहिलेली कुठलीही चिठ्ठी पोलिसांना आणि कुटुंबीयांना आढळून आलेली नाही. मात्र प्रेमप्रकऱणातील गुतागुंतीमुळे त्याने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. समीर पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये शिकत होता. व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून तो तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय होता. रेडलाईट डायरिज ही विविध ब्लॉगवर आधारित त्याची मालिका विशेष गाजली होती.