कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे पॅकेजिंग इंडस्ट्रीला टाळे लावण्याच्या वेळ; हजारो तरुणांच्या डोक्यावर बेरोजगारीची टांगती तलवार

दैनंदिन जीवनात खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तू सुबक पॅकेजिंग मध्ये मिळत असतात. पॅकेजिंग हे नुसते दिखाऊपणा साठी नसून आपण खरेदी केलेल्या मालाच्या सुरक्षेसाठी ही तितकेच महत्त्वाचे असते. या मुळे पॅकेजिंग इंडस्ट्रीला उतरती कळा लागणे म्हणजेच संपूर्ण उत्पादन क्षेत्रासाठी ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल.

    पिंपरी: गेल्या चार महिन्यांमध्ये पॅकेजिंग इंडस्ट्रीसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत गेली आहे जवळपास ८० टक्‍क्‍यापर्यंत झालेल्या या दरवाढीमुळे पॅकेज इंडस्ट्रीला उतरती कळा लागली असून आता पॅकेजिंग इंडस्ट्रीला टाळे लावण्याची वेळ येऊन ठेपली आहे. या संदर्भात केंद्र शासन व राज्य शासनाने त्वरित लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना कराव्या अशी मागणी महा उद्योजक संघाच्या वतीने करण्यात आली असून याबाबत तातडीने उपाययोजना न केल्यास महा उद्योजक संघ पॅकेजिंग इंडस्ट्रीच्या सहकार्याने तर रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा महा उद्योजक संघाचे अध्यक्ष संजय भालेकर यांनी येथे आयोजित एका बैठकीत दिला आहे.

    याबाबत माहिती देताना उद्योजक भावेश दाणी म्हणाले की, दैनंदिन जीवनात खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तू सुबक पॅकेजिंग मध्ये मिळत असतात. पॅकेजिंग हे नुसते दिखाऊपणा साठी नसून आपण खरेदी केलेल्या मालाच्या सुरक्षेसाठी ही तितकेच महत्त्वाचे असते. या मुळे पॅकेजिंग इंडस्ट्रीला उतरती कळा लागणे म्हणजेच संपूर्ण उत्पादन क्षेत्रासाठी ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल.

    सातत्याने होणार्‍या या दरवाढीमुळे घेतलेल्या ऑर्डर पूर्ण करत असताना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. सध्या नुसत्या पुणे जिल्ह्यात सहाशे कोरोगेटेड मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहेत आणि त्यावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल. या बिकट परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी पिंपरी चिंचवड पुणे मॅन्युफॅक्चरर ग्रुप आणि महा उद्योजक महाराष्ट्र राज्य यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारने लवकरात लवकर तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संघाचे अध्यक्ष संजय भालेकर यांनी दिला.

    या बैठकीस पिंपरी, चिंचवड, चिखली, तळवडे, भोसरी, चाकण, पुणे व रांजणगाव या औद्योगिक परिसरातील कोरोगेटेड मॅन्युफॅक्चरर उद्योजक अनिल भालेकर, भावेश दाणी, सुनील अगरवाल, संजीव मिश्रा, रवि सचदेव, नवीन सरोगी, स्वप्नील चौधरी, संतोष गोरे, विशाल अजमेरा, अशोक चांडक, अमित जाधव, हेमंत कुशारे, नाना आवारे, प्रतीक पवार, जगमोहन अग्रवाल आदी उद्योजक उपस्थित होते.