ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेसाठी महाराष्ट्रभर फिरुन प्रचार करणार :  किशोर मासाळ

भिगवण : ओबीसी प्रवर्गाची जातिनिहाय जनगणना झालीच पाहिजे, ही मागणी गेली अनेक वर्ष होत आहे. अनेक खासदार तसंच विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी तशी मागणी केली आहे. ओबींसीची स्वतंत्र जातीनिहाय जणगणना झालीच पाहिजे अशी मागणी किशोर मासाळ यांनी केंद्राकडे केली असुन यासाठी महाराष्ट्रभर फिरून प्रचार आणि प्रसार करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांनी दिली आहे.

      २०२१ मध्ये जी जनगणना होणार आहे त्यामध्ये जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि त्यामध्ये देखील ओबीसींचा कॉलम स्वतंत्ररित्या समाविष्ट केला जावा, अशी जनजागृती किशोर मासाळ राज्यभर फिरुन करणार आहेत.
      बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘हु वेअर द शुद्राज’ या ग्रंथाचा दाखला देत जोपर्यंत ओबीसींची स्वतंत्र जनगणना होणार नाही तोपर्यंत ओबीसी समाज आणि शासनाला देखील त्यांचे खरे प्रश्न समजणार नाहीत असं म्हटलं आहे मात्र अनेक वर्ष राज्यकर्ते या मागणीकडे दुर्लक्ष करत आहेत ओबीसींची संख्या समजली तरच त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळु शकतो यासाठी जातनिहाय जनगणनेसाठी प्रसार आणि प्रचार अवश्यक असुन २०२१ च्या जनगणनेत जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आणु नये असा ईशारा किशोर मासाळ यांनी दिला आहे. अशी मागणी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील केली आहे मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याने राज्यात फिरणार असल्याचे मासाळ म्हणाले. 
      दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्पात मागासवर्गीय, अल्पसंख्याक समाजासाठी विविध योजनांचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात परिस्थितीवर लक्ष देण्याची गरज आहे. विविध योजना यशस्वी होतील जेव्हा शेवटच्या रांगेमधला शेवटचा नागरिक लाभार्थी होईल मात्र त्यासाठी आगोदर ओबीसी जनगणना अवश्यक आहे असेही मासाळ म्हणाले.