विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी  नाभिक संघटनेचे उद्या आंदोलन

शिरूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन सुरू असल्याने गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवसांपासुन हातावर पोट असलेल्या सलुन व्यवसायिकांची अर्थिक अडचणीमुळे उपासमारिसर विविध अडचणींचा सामना कराव लागत

शिरूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन सुरू असल्याने गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवसांपासुन हातावर पोट असलेल्या सलुन व्यवसायिकांची अर्थिक अडचणीमुळे उपासमारिसर विविध अडचणींचा सामना कराव लागत असुुन याबाबत शासनास वेळोवेळी निवेदन देऊन सलुन दुकान सुरू करण्यास परवानगी द्यावी,अर्थिक पॅकेज जाहिर करावे यांसह विविध मागणी करूनही शासन दखल घेत नसल्याने महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्यावतीने राज्यभर आंदोलन करण्यात येणार असुन शिरूर तालुका व शहर नाभिक संघटनेच्यानतीनेही उद्या मंगळवार दि.९ रोजी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करत शिरूर तहसिल कार्यालयासोर मुक अभिनव पध्दतीने सलुन काम करून निदर्शन करण्यात येणार असल्याचे निवेदन शिरूर तहसिलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.

       यावेळी तालुकाध्यक्ष गणपत क्षिरसागर,शहराध्यक्ष निलेश भोसले,माजी शहराध्यक्ष रणजीत गायवाड,माजी उपाध्यक्ष गणेश शिंदे,सल्लागार गोरक्ष गायकवाड,तालुका सचिव दत्तात्रय शिंदे,बाळासाहेब गायकवाड उपस्थित होते.