अपघात टाळण्यासाठी ग्रामस्थांनी झाडे टाकुन वाहतुक केली बंद

मंचर : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील काठापूर बुद्रुक येथील घोडनदीवर असलेल्या बंधाऱ्यांच्या पुलावरुन मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. पुलावर अपघातग्रस्त खड्डा निर्माण झाल्याने अपघात टाळण्यासाठी सध्या झाडे टाकून हा पुल वाहतुकीस बंद केला आहे.

मंचर : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील काठापूर बुद्रुक येथील घोडनदीवर असलेल्या बंधाऱ्यांच्या पुलावरुन मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. पुलावर अपघातग्रस्त खड्डा निर्माण झाल्याने अपघात टाळण्यासाठी सध्या झाडे टाकून हा पुल वाहतुकीस बंद केला आहे. काठापुर बुद्रुक आणि काठापूर खुर्द (ता.शिरुर )या दोन गावांना जोडणारा तसेच घोडनदीवरील पाणी अडवण्यासाठी काठापुर याठिकाणी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर वाळू,मुरुम,मातीची जड वाहतूक बंधाऱ्यांवरील पुलावरुन होत असल्याने बंधाऱ्याला धोका निर्माण झाला आहे. बंधाऱ्याला खड्डे पडले आहेत. वाहतुकीकडे जलसंपदा विभाग व स्थानिक ग्रामस्थांचे दुर्लक्ष झाल्याचे पहावयास मिळत आहे. ग्रामपंचायतींनी बंधाऱ्यांच्या दोन्ही बाजूला लोखंडी अँगल लावून कमी उंचीचे प्रवेशद्वार बनवले. तर मात्र मोठी वाहने बंधाऱ्यांवरुन जाणार नाहीत. पाणी अडवण्यासाठी आणि स्थानिक नागरिकांना ये-जा करण्यासाठी  बंधाऱ्यावरील पुलाचा उपयोग करणे गरजेचे असताना मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक केली गेल्याने बंधाऱ्यांचे नुकसान झाले आहे.