कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिक्रापूरात आता ड्रोन द्वारे पोलिसांची करडी नजर

शिक्रापूर: देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचार बंदी लागू करत नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात आलेले होते, त्यांनतर शिक्रापूर येथे कोरोना बाधित डॉक्टर आढळून आला असताना देखील विनाकारण काही नागरिक घराबाहेर पडून वेगवेगळ्या ठिकाणी घोळका करत असल्याने आता या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी ड्रोनचा वापर सुरु केला असून ड्रोन द्वारे परिसरात करडी नजर ठेवण्यात येत आहे.

– गावातील सर्व रस्ते बंद

शिक्रापूर (ता. शिरूर) येथे दोन दिवसापूर्वी एक सोनोग्राफी सेंटरचे डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले, त्यांनतर एकच खळबळ उडाली होती तर त्यांनतर प्रशासन जोमाने कामाला लागले असताना गावामध्ये फवारणी करत गावातील सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. अनेक ठिकाणी नागरिक गर्दी करत असल्याचे आढळून येत असल्यामुळे आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी परिसरात ड्रोन केमेरे द्वारे पाहणी करत कारवाई करण्याचे आदेश दिले असून त्या प्रमाणे शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, अमित देशमुख, राजेंद्र मदने, कल्पेश राखोंडे यांसह आदींनी परिसरात ड्रोन द्वारे पाहणी करण्यास सुरवात केली असून त्याद्वारे गर्दीवर कारवाई करण्यात येत आहे. यावेळी बोलताना ज्या ठिकाणी नागरिकांची गर्दी आढळून येईल त्या ठिकाणी कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी यांनी सांगितले आहे.