तंबाखूची पुडी, देशी दारू महागली ; देशी – विदेशी दारुची चोरटी विक्री जोरात

कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी सरकारने दारुविक्रीला परवानगी दिली. मात्र, अतिरिक्त महसूल जमा करणे हा त्यामागचा उद्देश होता. त्यामुळे सर्वच मद्यपी स्वतःला अर्थव्यवस्थेचे पाईक समजू लागले होते. अर्थव्यवस्था डळमळीत होण्यापासून वाचविण्याचे श्रेय घेणाऱ्या या मद्यपींनाच सरकारने पुन्हा लक्ष्य केले आहे.

    पिंपरी : राज्य सरकारने कोरोना साखळी खंडित करण्यासाठी कठोर नियमावली लागू केल्यानंतर तंबाखूजन्य पदार्थ, देशी – विदेशी दारुची चोरटी विक्री जोरात सुरू झाली आहे. गेल्या लॉकडाउनमध्ये रिकामी झालेली तिजोरी भरण्यासाठी सरकारनेच दारू विक्रीला परवानगी दिली होती. त्या वेळी आम्ही अर्थव्यवस्थेला उभारी देतोय, असे सांगणाऱ्या मद्यपींची छाती काही इंचाने फुगली होती.

    आता नव्या नियमावलीत सरकारने मद्यविक्रीला चाप लावल्याने अर्थव्यवस्थेच्या या पाइकांची मात्र पंचायत झाली आहे. दारुचे गुत्ते बंद असले तरी अवैध मार्गाने तिप्पट किंमत मोजून आपली तलफ भागविण्याची वेळ या ‘देशीप्रेमीं’वर आली आहे. सोबतीला दहा रुपयांना मिळणाNया तंबाखूच्या पुडीसाठी आता ४० रुपये मोजावे लागत आहेत.

    यथावकाश कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी सरकारने दारुविक्रीला परवानगी दिली. मात्र, अतिरिक्त महसूल जमा करणे हा त्यामागचा उद्देश होता. त्यामुळे सर्वच मद्यपी स्वतःला अर्थव्यवस्थेचे पाईक समजू लागले होते. अर्थव्यवस्था डळमळीत होण्यापासून वाचविण्याचे श्रेय घेणाऱ्या या मद्यपींनाच सरकारने पुन्हा लक्ष्य केले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यातील सर्वच ठिकाणी देशी – विदेशी दारुची दुकाने पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा खिशाला झळ बसू लागली आहे.

    गेल्या लॉकडाउनमध्ये केंद्र सरकारने तंबाखूजन्य पदार्थांसोबतच दाय विक्रीवर निर्बंध घातले होते. त्या वेळीदेखील किरकोळ विक्रीच्या किमतीपेक्षा दुप्पट – तिप्पट दराने आपली तल्लफ भागविण्याची वेळ बहुसंख्येने अनेकांवर आली होती. त्या वेळी तंबाखूच्या पुडीचे दर ७० रुपयांच्या घरात पोचले होते. तर, देशी – विदेशीचा साठा उपलब्ध करून घेण्यासाठी मद्यपींना अपार कष्ट घ्यावे लागत होते. कारण, दुकाने बंद म्हटल्यावर साठेबाजी करून अवैध मद्यविक्रीला सर्वच ठिकाणी जोर आला होता. जसजसा लॉकडाउन लांबत गेला तसतशी दारुच्या किमतीतही वाढ होत राहिली. त्यामुळे तलफ भागविण्यासाठी दोघा – तिघांनी एकत्र येऊन ‘टांगा’ करण्याचे प्रकारही सर्रासपणे बघायला मिळत होते. कुठेतरी आडबाजूला, कुपाटीला जाऊन पेग रिचवत उसने अवसान घेऊन हे मद्यपी थेट घरचा रस्ता धरायचे. कारण, पोटभर पिऊन धिंगाणा घालायला दारूचे दरच कुणाला परवडेनासे झाले होते. तीच स्थिती तंबाखू खाणाऱ्यांच्या बाबतीतही अनुभवायला येत होती. चौकातल्या पारावर एकमेकांमध्ये फिरवली जाणारी तंबाखूची पुडी विकत घेणे परवडत नसल्याने जो तो आपल्यापरीने स्टॉक करून तलफ भागवत होता. अनेक ठिकाणी तर महागाची दारू विकत घ्यावी लागते म्हणून दुकाने फोडून तेथील माल लंपास करण्याचे धारिष्ट्यही काही मद्यपींनी दाखविले होते.