पुणेकरांसाठी समाधानकारक बातमी

१८२२ जणांना डिस्चार्ज तर नवीन ७८१कोरोना बाधित

पुणे : शहरात कोरोनातून बरे होणार्‍या रुग्णांची संख्या मागील काही दिवसांत झपाट्याने वाढली आहे. विशेष असे की नवीन रुग्णांपेक्षा डिस्चार्ज देण्यात येणार्‍या रुग्णांची संख्या वाढतेय ही पुणेकरांसाठी समाधानाची बाब आहे. आज तब्बल १ हजार ८२२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून तुलनेत नवीन केवळ ७८१ रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी टेस्टची संख्या तुलनेने कमी असल्याने नवीन बाधितांची संख्या कमी असल्याचे दिसून आले आहे.

     शहरात मागील महिन्याभरापासून संशयितांच्या तपासणीचे प्रमाण साधारण ७ हजारांपर्यंत वाढले आहे. सात हजारजणांच्या तपासणीतून साधारण २३ टक्के रुग्ण समोर येत आहेत. तर कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण मागील आठवड्यात नवीन रुग्णांच्या तुलनेत अधिक राहीले आहे. शहरातील एकूण रुग्णसंख्येने ५८ हजार ३०४ पर्यंत झेप घेतली असली तरी बरे झालेल्या रुग्णांची संख्या चाळीस हजारांच्या अगदी समीप आली आहे. आजमितीला बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३९ हजार ९८१ इतकी आहे. दुर्देवाने आजही २३ रुग्ण मरण पावले असून यामध्ये येथील रुग्णालयांत उपचार घेणार्‍या महापालिका हद्दीबाहेरील ५ रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या देखिल १ हजार ३८४ पर्यंत पोहोचली आहे. शहरातील रुग्णालये, कोव्हिड सेंटर तसेच होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांची संख्या १६ हजार ९८१ इतकी असून त्यापैकी ६३३ रुग्ण ऑक्सीजनवर आहेत. त्यातील ३८९ रुग्ण गंभीर असून त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान आज ४ हजार ६०४ संशयितांंचे स्वाब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

हॉटेल,मॉल आदीसाठी नियमावली

शहरातील  प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील  निवासी हॉटेल, आणि मॉल उद्या (बुधवार)पासून सुरु करण्यात येणार आहेत. यासंदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी नुकतीच आदेश दिले आहेत. यामध्ये काही अटी आणि शर्यतीसह परवाणगी देण्यात आल्याचे स्पप्ट करण्यात आले आहे.

शहरामधील हॉटेल आणि मॉल गेल्या चार महिन्यांपासून बंद होते.राज्यशासनाच्या आदेशानुसार आता यांना परवाणगी देण्यात येत आहे. असे असले तरी महापालिका प्रशासनाने काही अटी सुध्दा घातल्या आहेत. ज्या निवासी हॉटेलमध्ये विलगिरकरण कक्ष आहे, तो सुरु राहिली . हॉटेल व्यावसायिकांना ३३ टक्के क्षमतेनेच सुरु कराता येतील. आवश्यक्ता भासल्यास उर्वरीत जागा विलगिकरणासाठी द्यावी लागेल.

हॉटेल अथवा मॉलच्या दर्शनीभागात कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या माहितीचे फलक लावणे आवश्यक आहे. वाहनतळावर नागरिकांची गर्दी होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे, हॉटेल अथवा मॉलमध्ये  उभे राहण्यासाठी अथवा रांगेसाठी खुणा करणे आवश्यक आहे. ग्राहकांनी हॉटेलमध्ये अथवा मॉलमध्ये डिजीटल पेमेंचा (ई- चलनाचा) वापर करावा.

हॉटेलमध्ये कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तीला प्रवेश देवू नये. ग्राहकांनी प्रवेश करताना चेहरा झाकणे आवश्यक आहे.  हॉटेलमध्ये येणार्‍यांनी आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करणे आवश्यक आहे. जलतरणव व्यायामशाळा तलाव बंद ठेवावेत. उपगारगृहाचा वापर शक्य तो टाळावा. केवळ १५ सदस्य असलेल्या बैठकांनाच परवाणगी देण्यात यावी. हॉटेलमधून ग्राहक बाहेर पडल्यानंतर रुम २४ तास खुली ठेवावी. स्वच्छतागृहाचे निरजंतुकीकरण करावे अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

मॉलमध्ये येणार्‍या प्रत्येक व्यक्तीची तपासणी होणे आवश्यक आहे. ग्राहकांना एकदम आत सोडू नये टप्याटप्याने आतमध्ये सोडावे.ग्राहकांमध्ये पुरेसे अंतर राहिल याची व्यवस्था करावी.