no parking board in city

बाजार समितीची संकल्पना ही शेतकरी, आडते व ग्राहक यांचे हित जोपासण्याकरिता आहे. बाजार समितीने हा नियम फक्त पैसे कमविण्यासाठी केला आहे का? महाराष्ट्रातील कुठल्याही बाजार आवारात पे अ‍ॅन्ड पार्क योजना लागू नाही. गुळ भूसार विभागातून करोडो रुपयांचा सेस वर्षाकाठी बाजार समितीकडे जमा होत असतो. असे असताना या गोष्टीचा विचार न करता पे अ‍ॅन्ड पार्किंगची योजना राबविण्यामागचा उद्देश समजून येत नाही.

    पुणे : पुणे बाजार समितीने भुसार बाजारात शेतमाल खरेदी विक्रीसाठी येणाऱ्या वाहनांसह आडते, कामगार आदी घटकांसाठी पार्किंग शुल्क लागू केले असून त्याची अंमलबजावणी येत्या शुक्ररवारपासून (दि.१६) अंमलबजावणी केली जाणार आहे. मात्र, वाहनांना प्रवेशशुल्क घेतले जात असताना पुन्हा पािर्कंग शुल्क का द्यायचे असा सवाल उपस्थित करत दि पूना मर्चंटस् चेंबरने या निर्णयाला विरोध केला असून याची अंमलबजावणी केल्यास भुसार बाजार बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.

    भुसार बाजारातील पे अ‍ॅन्ड पार्क योजनेबाबत बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड आणि गुळ भूसार विभाग प्रमुख रासकर साहेब यांच्याबरोबर चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली असता गुळ भूसार विभागातील व्यापारी, ग्राहक, दलाल व दुकानातील कर्मचारी यांना पार्किंगचे पैसद्यावे लागणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. मात्र, बाजा समितीने ८ जुलै रोजी काढलेल्या परिपत्रकामध्ये पार्किंगची रक्कम आडते, ग्राहक, दलाल व इतर घटक यांना लागू केली आहे. याचा परिणाम व्यापारावर होणार आहे. त्यामुळे या योजनेस विरोध असल्याची माहिती चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावळी चेंबरचे माजी अध्यक्ष वालचंद संचेती, प्रविण चाेरबेले, सहसचिव विजय मुथा, अशोक लोढा, अनिल लुंकड आदी उपस्थित होते.

    बाजार समितीची संकल्पना ही शेतकरी, आडते व ग्राहक यांचे हित जोपासण्याकरिता आहे. बाजार समितीने हा नियम फक्त पैसे कमविण्यासाठी केला आहे का? महाराष्ट्रातील कुठल्याही बाजार आवारात पे अ‍ॅन्ड पार्क योजना लागू नाही. गुळ भूसार विभागातून करोडो रुपयांचा सेस वर्षाकाठी बाजार समितीकडे जमा होत असतो. असे असताना या गोष्टीचा विचार न करता पे अ‍ॅन्ड पार्किंगची योजना राबविण्यामागचा उद्देश समजून येत नाही. करोनाच्या दोन लाटेमध्ये अगोदरच व्यापारी आर्थिकदृष्टया अडचणीत असून व्यापाराची घडी विस्कळीत झालेली आहे. अशा परिस्थितीत बाजारात पे अ‍ॅन्ड पार्क योजना लागू केली तर गुळ भूसार विभागात ग्राहक येणार कसे? त्यामुळे पे अ‍ॅन्ड पार्किंग योजनेस विरोध असून व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे. ही योजना राबविल्यास गुळ भूसार विभाग बेमुदत बंद ठेवण्यात येईल, असा इशारा चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिला.