संतापजनक घटना , शिरूरमध्ये  डॉक्टरकडून रुग्ण महिलेवर अत्याचार

शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील न्हावरा येथील डॉक्टरने रुग्ण महिलेकडे शरीरसुखाची मागणी करत महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. रामहरी लाड असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे.  पीडितेच्या तक्रारीनंतर डॉक्टरवर शिरूर पोलीस स्टेशन येथे विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर ता. शिरूर येथील सदर पीडित महिला आजारी असल्याने तिच्या वडिलांनी न्हावरा येथील डॉ. रामहरी लाड यांच्या नाथकृपा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. रविवारी रात्री डॉ. रामहरी लाड यांनी पीडितेला तपासणी करायची आहे असे बोलून त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतले यावेळी डॉक्टरांनी तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली.या प्रकारानंतर घाबरलेल्या पीडित महिलेने  डॉक्टरांच्या केबिनबाहेर  धाव घेतली आणि आपल्या घरच्यांना फोन करून घडलेली सर्व घटना सांगितली, त्यानंतर पीडितेच्या पालकांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे धाव घेत घटनेबाबत शिरूर पोलिस स्टेशन येथे आरोपी डॉ लाड विरोधात  फिर्याद दिली, पीडित महिलेने शिरूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी न्हावरा येथील नाथकृपा हॉस्पिटल चे संचालक डॉ. रामहरी भुजंगराव लाड रा. न्हावरा ता. शिरूर जि. पुणे यांच्याविरुद्ध विनयभंग प्रकरणी गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोटे हे करत आहेत.