Comforting news for borrowers; Uniform stamp duty on documents related to bank loans

काही महिन्यापूर्वी बोगस दस्तच्या साह्याने खोट्या पत्त्यावर गाडी घेतल्याचे तक्रार विमान नगर पोलीस स्टेशन येथे दाखल झाली होती.मुंबई मध्ये देखील तक्रार दाखल होऊन कोर्टाकडून आदेश प्राप्त करून कारवाई करण्यात आली होती अशी माहीती असाेिसएशनचे अध्यक्ष सचिन शिंगवी यांनी िदली. या तक्रारीसंदर्भात नाेंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली गेली हाेती.

    पुणे : सर्व सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बनावट दस्त ओळखण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पडताळणीमध्ये बोगस दस्त आढळून आल्यास ते कारवाई करण्यासाठी सह जिल्हा निबंधक यांच्याकडे सोपविण्यात यावेत असे पत्रक नाेंदणी व मुद्रांक विभागाने काढले आहे.

    असाेिसएशन अाॅफ िरयल इस्टेट एजेंट्स या संघटनेच्यावतीने यासंदर्भात एक वर्षापासून नोंदणी व मुद्रांक विभागकडे पाठपुरावा केला जात हाेता. संघटनेच्यावतीने बोगस दस्ताच्या प्रतीसह िवभागाकडे तक्रार केली हाेती. या तक्रारीत लिव्ह अँड लायसन या दस्ताचा वापर खाते उघडण्यासाठी बँकेत, गाडी घेण्यासाठी आरटीओकडे, अन्नधान्य पुरवठा अधिकाऱ्यांकडे रेशन कार्डसाठी, आधार कार्डच्या पुराव्यासाठी आणि इतर सरकारी कार्यालयात रहिवासी पुरावा म्हणून होत असतो.

    काही महिन्यापूर्वी बोगस दस्तच्या साह्याने खोट्या पत्त्यावर गाडी घेतल्याचे तक्रार विमान नगर पोलीस स्टेशन येथे दाखल झाली होती.मुंबई मध्ये देखील तक्रार दाखल होऊन कोर्टाकडून आदेश प्राप्त करून कारवाई करण्यात आली होती अशी माहीती असाेिसएशनचे अध्यक्ष सचिन शिंगवी यांनी िदली. या तक्रारीसंदर्भात नाेंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली गेली हाेती.

    सदर पत्राची दाखल घेऊन यापूर्वी संबंधित साहजिल्हा निबंधक याना अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु सदर आदेशास केराची टोपली दाखवण्यात आली.त्यामुळे पुन्हा याबाबत पाठपुरावा करण्यात आला. याची दखल विभागाने घेतली असुन, नोंदणी व मुद्रांक विभागाने सर्व दुय्यम निबंधक कार्यालय व सह जिल्हा निबांधक कार्यालयास कारवाई करण्याचे निर्देश दिले हाेते. त्यानुसार आता सर्व सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बनावट दस्त ओळखण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार अाहे. दस्त पडताळणी मध्ये बोगस दस्त आढळून आल्यास ते कारवाई करण्यासाठी सह जिल्हा निबंधक यांच्याकडे सोपविण्यात यावेत असे पत्रक विभागाने काढले आहे. या मागणीसाठी असाेिसएशनच्यावतीने मंगेश पाटील, योगेश पम्पालिया, वाभिरे, शुभम घोरपड़े, अभिषेक सुकाळे,आकाश तांबडे, विकास पडावे, ओंकार मिरजकर यांनी प्रयत्न केले.