नियम पाळणाऱ्या रिक्षांतून प्रवास करा ; पुणेकरांना पोलिसांचे आवाहन

दोन आठवड्यांत वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाने संयुक्तरीत्या दंडात्मक कारवाई केली आहे; तसेच रिक्षाचालकांना चाप लावण्यासाठी पुणे स्टेशन परिसरात काटेकोरपणे तपासणी केली जात आहे. नियम न पाळणारे रिक्षाचालक स्टेशनचे भाडे स्वीकारत नसल्याचे दिसून आले आहे. तसेच, रिक्षा चालक शिस्तीचे पालन देखील करू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी सोमवारी रेल्वे स्थानकाबाहेर गणवेशासह आवश्यक सर्व नियमांचे पालन करून प्रवासी वाहतुकीसाठी आलेल्या रिक्षाचालकांचा एका रांगेतील फोटो पोस्ट करून पुणेकरांना संदेश दिला आहे.

  पुणे : गणवेश असलेले, आरटीओचा परवाना असल्याचा ‘बॅज’ लावणाऱ्या तसेच नियमांचे पालन करत असलेल्या रिक्षामधूनच पुणेकरांनी प्रवास करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अशा रिक्षातून प्रवास करताना प्रवाशांना तुलनेने सुरक्षेची हमी मिळेल, असा एक फोटो ‘ट्टीटर’वर  पोस्ट केला आहे.
  पुण्यात अल्पवयीन मुलींवर रिक्षा चालकांनी आत्याचार केल्याच्या दोन घटना घडल्या. त्यामुळे पुणे पोलीसांनी बेकायदा व बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. दोन आठवड्यांत वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाने संयुक्तरीत्या दंडात्मक कारवाई केली आहे; तसेच रिक्षाचालकांना चाप लावण्यासाठी पुणे स्टेशन परिसरात काटेकोरपणे तपासणी केली जात आहे. नियम न पाळणारे रिक्षाचालक स्टेशनचे भाडे स्वीकारत नसल्याचे दिसून आले आहे. तसेच, रिक्षा चालक शिस्तीचे पालन देखील करू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी सोमवारी रेल्वे स्थानकाबाहेर गणवेशासह आवश्यक सर्व नियमांचे पालन करून प्रवासी वाहतुकीसाठी आलेल्या रिक्षाचालकांचा एका रांगेतील फोटो पोस्ट करून पुणेकरांना संदेश दिला आहे.

  -११ हजार जणांवर कारवाई
  बेशिस्त रिक्षाचालकांवर कडक कारवाई केली जात असून, आजपर्यंत १० हजार ८५९ रिक्षाचालकांवर कारवाई झाली आहे. त्यामुळे बेशिस्तीला चाप बसला असून, नियम न पाळणाऱ्या रिक्षा चालकांचे धाबे दणाणले आहेत.
  -वाहतूक पोलिसांनी केलेली कारवाई
  रिक्षा चालवताना गणवेश नसणे ८५०२
  विनापरवाना रिक्षा चालवणे १६०५
  बॅच नसणे ७५२